2024 Kawasaki Z900 Price, Mileage, Specifications: स्टायलिश लुक आणि आकर्षक फीचर्ससह अपडेटेड Kawasaki Z900 बाईक भारतात लॉन्च! किंमत 9.29 लाख रुपये

2024 Kawasaki Z900 Price in Marathi: जपानी दुचाकी वाहन निर्माता कंपनी कावासाकीने आपली स्टायलिश बाईक कावासाकी Z900 भारतीय बाजारपेठेत अतिशय दमदार फीचर्स आणि लूकसह अपडेटेड Z900 मॉडेल लॉन्च केले आहे. या बाईकची भारतातील एक्स-शोरूम किंमत 9.29 लाख रुपये आहे. 

Kawasaki Z900 Price 

948 cc लिक्विड-कूल्ड इंजन असलेली स्टायलिश डिझाईन सोबत कावासाकीने Kawasaki Z900 हि गाडी भारतीय बाजारामध्ये आणलेली आहे. तर आता आपण कावासाकी Z900 चे डिटेल प्राईस, डिझाईन, फीचर्स बद्दल बघूयात.

Kawasaki Z900 Price in Pune – कावासाकी Z900 किंमत 

Kawasaki Z900 Price
Kawasaki Z900 Price

कावसाकी Z900ची भारतामध्ये एक्स शोरूम किंमत 9.29 लाख रुपये आहे. पुण्यामध्ये स्टँडर्ड व्हेरीएंट ऑन रोड प्राईस 11,58,235 रुपये आहे. ऑन रोड किमतीमध्ये एक्स शोरूम प्राईस, आरटीओ आणि इन्शुरन्स समाविष्ट आहे.

Kawasaki Z900 Features – कावासाकी Z900 फीचर्स

कावासाकी Z900 फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये आपल्याला स्मार्टफोन कनेक्टिविटी, TFT कलर इंस्ट्रूमेंट पैनल, इंटीग्रेटेड राइडिंग मोड्स, पावर मोड्स, डुअल चैनल ABS या सर्व सुविधा मिळतात.

कावासाकी Z900 ही एक सुपर बाईक आहे. यात एक स्टॅंडर्ड वेरियंट आणि दोन कलर उपलब्ध आहेत. ही गाडी अँटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टीम सोबत येते. या गाडीचे वजन 212 किलोग्राम आहे. आणि हीच्या इंधन टाकीची क्षमता 17 लीटर आहे.

Kawasaki Z900 Specifications – कावासाकी Z900 वैशिष्ट्ये

Kawasaki Z900 ची max speed ही 153 mph आहे. कंपनीद्वारे दिल्या माहितीत या गाडीची (Kawasaki Z900 top speed) टॉप स्पीड 155 mph आहे. या गाडीचा average हा 15 किमी प्रति लिटर आहे.

Kawasaki Z900 ची किंमत ₹9.29 लाख एक्स-शोरूम
इंजन पावर 948 cc लिक्विड कोल्ड इन-लाईन-फोर-सिलेंडर इंजन
ट्रान्समिशन 6 स्पीड ट्रान्समिशन
फीचर्स स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टीएफटी कलर इन्स्ट्रुमेंट पॅनल, इंटिग्रेटेड रायडिंग मोड, ड्युअल चॅनल एबीएस
मायलेज 15 किमी प्रति लिटर
कर्ब वजन 212
व्हेरीएंट कलर ऑप्शन एक व्हेरियंट आणि दोन कलर ऑप्शन्स आहेत.

Kawasaki Z900 Engine – कावासाकी Z900 इंजन

या बाईक मध्ये अतिशय दमदार पावर 948 सीसी लिक्विड कुल्ड इनलाईन-फोर-सिलेंडर इंजन आहे. हे पावरफुल इंजन 9,500 rpm वर 125 bhp चा पावर आणि 7,700 rpm वर 98.6 Nm चा टॉर्क जनरेट करते. हे इंजन स्लिप क्लचसह 6 स्पीड गिअर बॉक्सशी जोडलेले आहे.

Kawasaki Z900 Design – कावासाकी Z900 डिझाईन

ही एक पावरफुल बाईक आहे. या गाडीमध्ये कावासाकीच्या तर्फे आपल्याला खूप आकर्षक डिझाईन बघायला मिळते. तुम्हाला स्पोर्ट बाईकच्या आकर्षण असेल, तर ही गाडी तुम्हाला खूप आवडणार! कारण या गाडीमध्ये एलईडी हेडलाईट, मस्कुलर टॅंक, शार्प बॉडी लाईन्स, एलईडी टेल लाईट आणि इंडिकेटर्स दिसायला अतिशय फॅन्सी आहेत.

कावासाकी Z900 चा TFT तुमच्या स्मार्टफोनशी ‘Rideology’ याद्वारे लिंक केला जाऊ शकतो आणि त्याचा वापर सूचना आणि नेव्हिगेशन अलर्ट प्राप्त करण्यासाठी केला जाऊ शकतो. या गाडीच्या सस्पेन्शन बद्दल सांगायचं झालं तर सस्पेन्शनसाठी USD फ्रंट फोर्क आणि मोनोशॉक रियर युनिट मिळते, जे प्रिलोड आणि रिबाउंड दोन्ही साठी वापरले जाते. ब्रेकिंग साठी समोरच्या बाजूला 300 mm डिस्कद्वारे हाताळले जाते, तर मागील बाजूस एकच 250 mm डिस्क युनिट आहे.

Kawasaki Z900 Mileage

 मार्केटमध्ये कावासाकी Kawasaki Z900 ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल आर शी स्पर्धा करते. या गाडीच्या मायलेजचा विचार केला तर, आपल्याला 15 किलोमीटर प्रति लिटर चा मायलेज मिळतो. या गाडीची फ्यूल टॅंक कॅपॅसिटी 17 लिटर आहे.

हे हि वाचा >>

Kawasaki Z900 FAQ

Q : 2024 मध्ये कावासाकी Z900 ची ऑन रोड किंमत किती आहे?

Ans : 2024 मध्ये पुण्यात कावासाकी Z900 ऑन रोड किंमत ही 11,58,235 रुपये आहे. या किमतीमध्ये एक्स-शोरूम किंमत, आरटीओ आणि विमा शुल्क समाविष्ट आहे.

Q: कावासाकी Z900 चा मायलेज किती आहे?

Ans : 15 किलोमीटर प्रति लिटर चा मायलेज आहे.

Q : Kawasaki Z900 कलर ऑप्शन?

Ans : या बाईक मध्ये दोन कलर उपलब्ध आहेत, Metallic Spark Black/ Metallic Matt Dark Gray आणि Ebony/ Metallic Matte Graphene Steel Gray.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment