Kinetic Green E Luna Price in Marathi: भारतामध्ये आता जास्त संख्येने लोक EV vehicles ला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवत आहेत. सोबतच भारत सरकार द्वारे सुद्धा इलेक्ट्रिक व्हेईकलच्या प्रोडक्शन वाढीसाठी पावले उचलली जात आहेत. याचाच विचार करता कायनेटिक कंपनीने आता भारतामध्ये कायनेटिक ग्रीन E Luna लॉंच केली आहे. देशामध्ये लुना ही सर्वांच्या परिचयाची आहे. जुन्या Moped Luna चेच आता नवीन व्हेरियंट EV कायनेटिक ग्रीन ई लुना (Kinetic Green E Luna) ही आहे. जर आपण बजेटमध्ये चांगल्या मोपेडच्या शोधात असाल तर, कायनेटिकची ही ग्रीन ई लुना आपल्यासाठी नक्कीच चांगला ऑप्शन आहे.
या EV Moped चे डिझाईन जुन्या Luna Moped सारखेच आहे. kinetic E Luna च्या रेंज बद्दल सांगायचं तर, सिंगल चार्ज मध्ये 110 किलोमीटरची रायडिंग रेंज देणारी ही ग्री ई लुना, आता दोन व्हेरिएंट म्हणजेच, Kinetic E Luna X1 आणि Kinetic E Luna X2 या दोन व्हेरियंटमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असणार आहे. Kinetic E Luna Price in India, रेंज, फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि बॅटरी पॉवर बॅकअप बद्दल आपण जाणून घेऊयात.
Kinetic Green E Luna Price in India – कायनेटिक ई-लुना ची किंमत
भारतामध्ये Kinetic Green कंपनीने E Luna Electric Moped लॉन्च केली आहे. या मोपेड मध्ये आपल्याला दमदार फीचर्स आणि आकर्षक डिझाईन बघायला मिळते. ही लुना मार्केटमध्ये दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च झाली आहे, त्यातला पहिला Kinetic E Luna X1 आहे ज्याची ऑन रोड किंमत ₹ 77,374 आणि दुसरे Kinetic E Luna X2 ची ऑन रोड किंमत ₹ 82,556 रुपये आहे.
व्हेरीएंट | ऑन रोड प्राईस |
ई-लूना X1 | ₹ 77,374 |
ई-लूना X2 | ₹ 82,556 |
Kinetic E Luna Moped बद्दल सर्वात महत्त्वाच सांगायचं म्हणजे या गाडीची बुकिंग ही सुरू झालेली आहे. आपण या इलेक्ट्रिक मोपेडला Kinetic Green च्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन केवळ 500 रुपये मध्ये बुकिंग करू शकता.
E Luna लॉन्च झाल्यामुळे लवकरच ती कायनेटिक ग्रीनच्या शोरूम वर अवेलेबल होणार आहे. या सर्व पुणे ऑन रोड किमती आहेत, यामध्ये आपल्याला आरटीओ आणि विमा मिळणार आहे.
Kinetic Green E Luna Specifications – कायनेटिक ग्रीन ई-लुना मुख्य वैशिष्ट्ये
Kinetic E Luna चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर, या मोपेडचा चार्जिंग टाईम जास्तीत जास्त 4 तास आहे. या E Luna ची टॉप स्पीड 50 kmph आहे.
#KineticGreen E-Luna: All-Electric and Stylish Avatar of the Iconic Luna
E-Luna is a high-speed Electric two-wheeler that is 100% designed, engineered and #MadeInIndia with a vision that masses, and not just classes, participate in the #EV revolution.@SulajjaFirodia #eluna pic.twitter.com/91Y3OcXJb7
— Kinetic Green (@KineticgreenEV) February 10, 2024
मुख्य हायलाइट्स
रायडिंग रेंज | 110 किमी |
टॉप स्पीड | 50 kmph |
कर्ब वजन | 96 किलोग्राम |
चार्ज करायला लागणारा वेळ | 4 तास |
ब्रेक टाईप | ड्रम |
कलर ऑप्शन | 5 |
बॅटरी | लिथियम आयन |
Kinetic Green E Luna Design – कायनेटिक ग्रीन ई-लुना डिझाईन
Kinetic Green ने ही E Luna अतिशय दमदार फिचर सोबत लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक मोपेडचे डिझाइन थोडेफार जुन्या लुनाप्रमाणेच आहे. परंतु कंपनीने यामध्ये काही लुक साठी नवीन ऍडव्हान्स कलर दिले आहेत. या इलेक्ट्रिक मोपेड मध्ये आपल्याला डिझायनिंग साठी circular headlight, मिनिमल बॉडी आणि सोबतच कम्फर्टेबल सीट्स बघायला मिळतात. ही Green E Luna आपल्याला 5 कलर ऑप्शन मध्ये बघायला मिळते, मलबेरी रेड, ओशन ब्ल्यू, पर्ल यलो, पार्किंग ग्रीन आणि नाईट स्टार ब्लॅक.
Kinetic Green E Luna Battery – कायनेटिक ग्रीन ई-लुना बॅटरी
E Luna मध्ये दोन व्हेरियंट आहेत, दोन्ही व्हेरियंट मध्ये आपल्याला वेगवेगळी बॅटरी बघायला मिळते. Kinetic E Luna X1 या मोपेड मध्ये आपल्याला 1.7 kWh लिथियम आयन बॅटरी आहे, जीला फुल चार्ज करायला जवळजवळ तीन ते चार तास लागतात.या मोपेडची रायडींग रेंज हि 90 km आहे.
Kinetic E Luna X2 या मोपेडमध्ये 2 kWh लिथियम आयन बॅटरी आहे, जीला चार्जिंग साठी 4 तास लागतात. दोन्ही मध्ये टॉप कॉलिटी लॉंग लाईफ बॅटरी दिली आहे. त्यामुळे आपल्याला गाडीचे सेफ्टी बद्दल काळजी करण्याची गरज नाही.या मोपेडची रायडींग रेंज हि 110 km आहे.
Kinetic Green E Luna Features – कायनेटिक ग्रीन ई-लुना चे फीचर
Kinetic Green द्वारे लॉन्च केलेल्या E Luna या मोपेडमध्ये खूप शानदार फीचर्स आहेत जसे की, डिजिटल स्पीडोमीटर, पोर्टेबल चार्जर, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, ड्युअल शॉक रिअर सस्पेन्शन, ड्रम ब्रेक, एलईडी हेडलाईट लाईट आणि या सगळ्यांसोबत यूएसबी चार्जिंग पोर्ट हे सगळ्यात महत्त्वाचे फीचर्स आहेत.
Kinetic Green E Luna दोन व्हेरिएंट मध्ये लॉन्च झालेली आहे आणि अतिशय दमदार फिचर सोबतच शानदार मायलेज देणारे इलेक्ट्रिक मोपेड म्हणून, ग्राहकांसाठी नक्कीच चांगला पर्याय आहे.
हे हि वाचा :
- 2024 Hero Xtreme 160R 4V New Launch in Marathi: एक्स्ट्रीम 160R शानदार मायलेज आणि पावरफुल इंजन सोबत लेटेस्ट फिचर्स, बघा किंमत
- TVS Raider 125 Specifications in Marathi: रेडर 125 आकर्षक कलर्स आणि डिझाईन मध्ये, जाणून घ्या किंमत अन फीचर्स
- Hero Xoom 160 Price, Design, Engine, Features in Marathi:Yamaha Aeroxला द्यायला टक्कर हिरोने लॉन्च केली ही स्टायलिश गाडी
Kinetic Green E Luna बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q : 2024 मध्ये कायनेटिक ग्रीन ई-लुनाची ऑन रोड किंमत किती आहे?
Ans : 2024 पुण्यामध्ये कायनेटिक ग्रीन ई-लुनाची ऑन रोड किंमत ही 77,374 रुपये आहे. यामध्ये आरटीओ आणि विमा शुल्क समाविष्ट आहे.
Q : कायनेटिक ग्रीन ई-लुनाची लांबी आणि ग्राउंड क्लिअरन्स किती आहे?
Ans : लांबी 1985 mm आणि ग्राउंड क्लिअरन्स 170 mm.
Q : कायनेटिक ग्रीन ई-लुनाचे मुख्य स्पेसिफिकेशन काय आहे?
Ans : कायनेटिक ग्रीन ई-लुनाची रायडिंग रेंज 90 किलोमीटर आहे आणि या लुनाची टॉप ची स्पीड 50 kmph, चार्जिंग टाईम 4 घंटे आहे.