
2024 Bajaj Pulsar NS125 Price in India: भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये स्पोर्ट लुक असलेल्या बाईकला चांगली मागणी आहे. जर तुम्ही एक लाख रुपयांच्या बजेट मध्ये स्पोर्ट बाईक शोधत असाल तर, तुम्ही बजाज ऑटोची लोकप्रिय बाईक एनएस125 (Bajaj Pulsar NS125) खरेदी करू शकता. कंपनीने भारतात अपडेटेड पल्सर NS125 मॉडेल लॉन्च केलं आहे. नवीन पल्सर बाइक एनएस 125 ची एक्स-शोरूम किंमत 1,04,922 रुपये ठेवण्यात आली आहे. जुन्या मॉडलच्या तुलनेत बेबी पल्सर आता 5000 रुपयांनी महाग असणार आहे.
2024 नवीन बजाज पल्सर NS125 ला देखील मोठ्या पल्सर (NS160 आणि NS 200) प्रमाणेच अपडेट मिळतात. या बाईकची मस्क्युलर रचना पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे. पल्सर NS125 फ्रंट डिझाईन आणि साईड पॅनल मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, त्याच्या हेडलाइट्समध्ये काही अंतर्गत बदल करून, यामध्ये थंडर-आकाराचे एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. चला तर या बाईकची आणखी कुठली वैशिष्ट्ये आहेत. सोबतच प्राईज, फीचर्स आणि मायलेज बद्दल अधिक जाणून घेऊयात.
Bajaj Pulsar NS125 on road Price in Pune
नवीन 2024 बजाज पल्सर NS125 ची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 1,04,922 रुपये आहे. ही बाईक आता जुन्या मॉडेलच्या तुलनेत पाच हजार रुपयांनी महाग झाली आहे. मार्केटमध्ये या बाईकचा सामना Hero Xtreme 125R आणि TVS Raider 125 शी असणार आहे.

पुण्यात या बाईकची ऑन रोड किंमत ₹ 1,24,573 रुपये आहे. यामध्ये आरटीओ, विमा शुल्क आणि एक्स शोरूम किंमत समाविष्ट असणार आहे.
Bajaj Pulsar NS125 Variants And Colors
बजाज पल्सर एनएस125 भारतात दोन versions आहेत, बजाज पल्सर ns125 स्टॅंडर्ड आणि पल्सर ns125 ब्लूटूथ आहेत. या मोटरसायकल मध्ये आपल्याला चार कलर ऑप्शन्स फायरी ऑरेंज, ब्रंट रेड, प्युटर ग्रे, बीच ब्लू उपलब्ध होणार आहेत.
Bajaj Pulsar NS125 Specifications
Bajaj Pulsar NS125 इंजन | 125 cc |
पावर | 11.8 bhp |
टॉर्क | 11 Nm |
मायलेज | 50 किमी प्रति लिटर |
कर्ब वजन | 144 kg |
फ्यूल टॅंक कॅपॅसिटी | 12 लिटर |
कलर्स | फायरी ऑरेंज, ब्रंट रेड, प्युटर ग्रे, बीच ब्लू |
Bajaj Pulsar NS125 Features
बजाज पल्सर NS125 च्या फिचर्स बद्दल सांगायचं झालं तर, या बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. याद्वारे आपण रायडर एसएमएस, कॉल नोटिफिकेशन आणि फोनची बॅटरी लेवल किती आहे यासारखी माहिती पाहू शकतो.

पल्सर NS125 मध्ये आपल्याला यूएसबी पोर्ट आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम्स (एबीएस) देण्यात आले आहे. यूएसबी चा वापर आपण फोन किंवा इयरफोन चार्जिंग करण्यासाठी करू शकतो आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमद्वारे सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे.
बजाज पल्सर NS125 डिझाईन
2024 बजाज पल्सर NS125 मध्ये मोठ्या पल्सर प्रमाणे अपडेट्स देण्यात आले आहेत. या बाईकची मस्कुलर डिझाईन कायम ठेवण्यात आली आहे. याच्या फ्रंट डिझाईन मध्ये कुठलेच बदल करण्यात आले नाहीत. बजाज ने पल्सर NS125 च्या हेडलाईट मध्ये इंटरनल अपडेट केले आहेत. यामध्ये थंडर-आकाराच्या एलईडी डेटाईम रनिंग लाइट्स (डीआरएल) देण्यात आले आहे. यामध्ये 17 इंची अलोय व्हील्स देण्यात आले आहेत.
Bajaj Pulsar NS125 Engine and Suspension
2024 पल्सर NS125 मध्ये पूर्वीसारखेच 125 cc सिंगल सिलेंडर इंजन दिले आहे. हे इंजन 11.8 bhp चा पावर आणि 11 Nm चा पिक टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड गिअरबॉक्स दिलेला आहे.
बजाज पल्सर NS125 च्या सस्पेन्शनसाठी पुढच्या बाजूला टेलीस्कॉपिक फ्रंट फोर्क आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन दिलेले आहेत. ब्रेकिंग साठी या मोटरसायकल मध्ये सिंगल चैनल एबीएस फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक आहेत.
हे हि वाचा
- 2024 Hyundai Creta N-Line Price, Features, Design: क्रेटा एन लाईन धमाकेदार फीचर्ससह लॉन्च,मिळतील ही वैशिष्ट्ये
- 2024 Kawasaki Z650RS Price and Features: अपडेटेड कावासाकी Z650RS ची किंमत, फीचर्स आणि मायलेज जाणून घ्या
- Tata Nexon Dark Edition Price,Design, Specifications: Nexon चे डार्क एडिशन लाँच! जाणून घ्या काय असेल किंमत आणि फीचर्स
बजाज पल्सर NS125 FAQ
Q : पुण्यात बजाज पल्सर ns125 ची ऑन रोड किंमत किती आहे?
Ans : पुण्यात बजाज पल्सर ns125 ची ऑन रोड किंमत ही 1,24,573 रुपये आहे. यामध्ये 13,041 रुपयाचा आरटीओ शुल्क आणि 6,610 रुपयाचा विमा शुल्क समाविष्ट आहे.
Q : बजाज पल्सर ns125 साठी योग्य फायनान्स प्लान?
Ans : ₹6,229 चा डाऊन पेमेंट वर आणि 10% व्याजदर साठी, बजाज पल्सर ns125 चा EMI 4,274 रुपये असणार. ज्याची इन्स्टॉलमेंट तीन वर्षासाठी असणार.
Q : बजाज पल्सर ns125 चा मायलेज किती आहे?
Ans : Bajaj Pulsar NS125 चा रियल मायलेज हा 50 kmpl आहे, तर ARAI द्वारे पल्सर ns125 चा average 46 kmpl सांगण्यात आला आहे.