
Kawasaki Z650RS Price in Marathi: कावासाकी स्पोर्ट्स बाईक बनवणारी एक आघाडीची कंपनी आहे. Kawasaki नेहमीच आपल्या ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी त्यांच्या स्पोर्ट्स बाईक मध्ये वेगवेगळे फीचर्स देते. याचाच विचार करून कावासाकीने आपल्या मीडलवेट निओ-रेट्रो मोटरसायकल Z650RS चे अपडेटेड वर्जन ₹6.99 लाख एक्स-शोरूम किमतीमध्ये लॉन्च केलं आहे. Kawasaki Z650RS ची किंमत जुन्या Z650RS बाईकपेक्षा सात हजार रुपये जास्त आहे.
या बाईकमध्ये कोणतेही मेकॅनिकल बदल करण्यात आलेले नाहीत. या बाईकमध्ये दोन ट्रॅक्शन मोड आहेत. याशिवाय कावासाकी झेड 650 आरएस मध्ये केवळ मेटॅलिक मॅट कार्बन ग्रे रंग बघायला मिळणार आहे. मात्र जागतिक बाजारपेठेत ही बाईक इतरही कलर ऑप्शन मध्ये खरेदी केली जाऊ शकते. या बाईकच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Kawasaki Z650RS Price in India

Kawasaki Z650RS ची एक्स शोरूम प्राईस ही ₹6.99 लाख रुपये आहे. या बाईकची स्पर्धा Triumph Trident 660 शी आहे, ज्याची किंमत 8.12 लाख रुपये आहे. या बाईक मध्ये एकच व्हेरिएंट Kawasaki Z650RS स्टॅंडर्ड अवेलेबल असणार आहे. या बाईकची ऑन रोड पुणे प्राईज ₹8.74 लाख रुपये आहे.
Kawasaki Z650RS Specifications

Kawasaki Z650RS प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या गाडीचे वजन 192 किलोग्राम आहे. यामध्ये 649 cc BS6 फेज 2 इंजन आणि 12 लिटर ची फ्यूल कॅपॅसिटी आहे.
Kawasaki Z650RS एक्स-शोरूम प्राईज | ₹6.99 lakh |
इंजन कॅपॅसिटी | 649 cc लिक्विड कोल्ड |
पावर | 68 ps |
ट्रान्समिशन | 6 स्पीड ट्रान्समिशन |
फीचर्स | इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्वेल चॅनल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम |
मायलेज | 21 किमी प्रति लिटर |
फ्युएल टॅंक कॅपॅसिटी | 12 लिटर्स |
सीट हाईट | 800 mm |
Kawasaki Z650RS Features

Kawasaki Z650RS मध्ये केटीआरएस आणि कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम जोडल्याने हे मॉडेल अधिक सुरक्षित झाले आहे. विशेषता जेव्हा रस्ते ओले असतात. या बाईकच्या समोरच्या बाजूला गोलाकार हेडल्यांप, मध्यभागी डिजिटल रीडसह ट्वीन अनलॉक डायल, एक अश्रू ड्रॉप इंधन टाकी आणि स्लिम टेल सेक्शन आहे. या बाईक मध्ये ट्यूबलार डायमंड फ्रेम वापरण्यात आली आहे.
Kawasaki Z650RS इंजन आणि डिझाईन कशी असेल
कावासाकी Z650RS मध्ये आपल्याला अतिशय दमदार 649 cc लिक्विड-कोल्ड समांतर-ट्वीन इंजन मिळणार आहे. हे इंजन 8000 rpm वर 68hp पावर आणि 6700 rpm वर 64 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या गिअरबॉक्स मध्ये 6 स्पीड युनिट आहे, जे असिस्ट आणि स्लिप क्लाचसह येते.
या बाईकच्या डिझाईन बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये आपल्याला Retro डिझाईन बघायला मिळते. या रेट्रो स्टाईल बाईकच्या डिझाईन मध्ये आपल्याला गोल हेडलाईट, क्लासिक फ्युएल टॅंक, एलईडी हेडलाईट, एलईडी टेल लाईट बघायला मिळतात.
Kawasaki Z650RS Suspension and Brakes
Kawasaki Z650RS मध्ये टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशोक सस्पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. या बाईकमध्ये समोरच्या बाजूला 286 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला 172 mm डिस्क ब्रेक सिस्टीम आहे.
हे हि वाचा >>
- Tata Nexon Dark Edition Price,Design, Specifications: Nexon चे डार्क एडिशन लाँच! जाणून घ्या काय असेल किंमत आणि फीचर्स
- Hero Maverick 440 On Road Price in India: 1.99 लाख किमतीमध्ये भारतात लॉन्च! पहा फीचर्स, मायलेज आणि डिझाईन.
Kawasaki Z650RS बद्दल विचारले जाणारे प्रश्न FAQ:
Q : Kawasaki Z650RS मध्ये कलर कुठला आणि किती आहेत?
Ans : या बाईक मध्ये आपल्याला एकच कलर ऑप्शन बघायला मिळतो, जो मॅट कार्बन ग्रे कलर आहे.
Q : Kawasaki Z650RS चा मायलेज किती आहे?
Ans :Kawasaki Z650RS बाईकचा मायलेज 21 किमी प्रति लिटर आहे.
Q : Kawasaki Z650RS on road पुणे प्राईज किती आहे?
Ans : या बाईचे पुणे ऑन रोड प्राईस ₹ 8,74,390 रुपये आहे. यामध्ये आपल्याला आरटीओ, विमा शुल्क आणि एक्स-शोरूम प्राईस समाविष्ट मिळणार आहे.