Mahindra Thar Earth Edition Price, Features, Design: 15.40 लाख किमतीमध्ये महिंद्रा ने थारची अर्थ एडिशन केली लॉन्च; पाहा फीचर्स

Mahindra Thar Earth Edition
Mahindra Thar Earth Edition

Mahindra Thar Earth Edition Price in India: महिंद्रा थार एसयुव्ही(SUV) चे नवीन व्हर्जन लॉन्च होत आहे. कंपनीने या वर्जन ला( Mahindra Thar Earth Edition) थार अर्थ एडिशन नाव दिले आहे. ही कार पेट्रोल बरोबर डिझेल इंजिन मध्ये उपलब्ध असेल. महिंद्रा थार अर्थ एडिशनच्या पेट्रोल एमटीची एक्स-शोरूम किंमत 15.40 लाख रुपये आहे.

महिंद्रा थारच्या अर्थ एडिशनच्या ट्रान्समिशन मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गेअर बॉक्सचा समावेश असणार आहे. अतिशय आकर्षक लूक आणि डिझाईन मध्ये आपल्याला ही कार बघायला मिळणार आहे. हे व्हर्जन तुम्हाला वाळवंटाची अनुभूती देणार आहे. महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने या नवीन थार अर्थ एडिशन मध्ये काही कॉस्मेटिक बदल केलेले आहेत. या नवीन थारच्या डिझाईन, फीचर्स आणि किमतीबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Mahindra Thar Earth Edition Price in India 

Mahindra Thar Earth Edition मध्ये आपल्याला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शन बघायला मिळणार आहेत. यामध्ये आपल्याला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन मिळणार आहे.

Mahindra Thar Earth Edition Price
Mahindra Thar Earth Edition Price

महिंद्रा थार अर्थ एडीशनच्या पेट्रोल एमटीची एक्स-शोरूम किंमत 15.40 लाख रुपये आहे, तर AT ची एक्स-शोरूम किंमत 16.99 रुपये आहे. डिझेल एमटीची एक्स-शोरूम किंमत ही 16.15 लाख रुपये आहे आणि त्याच्या एटी व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 17.60 लाख रुपये आहे.

Mahindra Thar Earth Edition Variant Wise Price List

व्हेरियंट एक्स शोरूम प्राइजेस
Thar Earth Edition Petrol MT  ₹ 15.40 लाख
Thar Earth Edition Petrol AT ₹ 16.99 लाख 
Thar Earth Edition Diesel MT ₹ 16.15 लाख 
Thar Earth Edition Diesel AT ₹ 17.60 लाख 

Mahindra Thar Earth Edition Interior and Exterior Design

महिंद्रा थार मध्ये आपल्याला स्टायलिश डिझाईन बघायला मिळणार आहे. या कारच्या इंटिरियर मध्ये आपल्याला डॅशबोर्डवर VIN प्लेट मिळते. सोबतच इंटिरियर मध्ये लेदर सीट्स, बेज स्टिचिंग एलिमेंट्स, आणि सीट्स वर अर्थ ब्रॅण्डिंग आणि ड्यून डिझाईन हेडरेस्ट देण्यात आले आहेत. 

आणखी ड्युअल टोन एसी वेंडस पियानो ब्लॅक मध्ये एचव्हीएसी हाऊसिंग, डेकोरेटिव्ह विआयएन नंबर प्लेट, स्टिअरिंग व्हील वर डार्क क्रोम ट्वीन पीक लोगो आणि सेंटर गियर कन्सोल वर डार्क क्रोम एक्सेंट्स दिलेला आहे.

अर्थ एडिशन च्या एक्सटेरियर मध्ये डेझर्ट फ्यूरी, डेझर्ट थीम डकल्स, डेझर्ट प्युरी इन्सर्ट च्या सोबत ओआरवीयम, बॉडी कलर ग्रील, थार ब्रॅण्डिंग इन्सर्टस सोबत सिल्वर रंग च्या अलॉय व्हील्स आणि बी-पिलर्सवर अर्थ एडिशन बेजिंग मिळणार आहे.

Mahindra Thar Earth Edition Features

या कार मध्ये आपल्याला अतिशय आकर्षक फीचर्स बघायला मिळतात. महिंद्रा थार चे हे स्पेशल अर्थ एडिशन थार वाळवंटापासून प्रेरीत आहे. महिंद्राने ही एसयूव्ही कार मॅट ‘डेझर्ट फ्यूरी’ फिनिश सोबत आणली आहे. ही कार एलएक्स हार्ड टॉप 4×4 व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

Mahindra Thar Earth Edition Features
Mahindra Thar Earth Edition Features

या कारमध्ये आपल्याला सिल्वर आलोय व्हील्स आणि मॅट ब्लॅक बेजल्स मिळतात. कारच्या बाहेर अर्थ बॅजिंगही देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने इंटिरियर मध्ये काही खास बदलही केले आहेत.

Mahindra Thar Earth Edition Engine Performance

महिंद्रा थार च्या अर्थ एडिशन मध्ये आपल्याला पेट्रोल आणि डिझेल दोन इंजन ऑप्शन उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजन असणार आहे, जो 200 bhp चा पावर आणि 380 एनएम चा टॉर्क जनरेट करतो.

 डिझेलमध्ये 2.2-लिटर डिझेल इंजन समाविष्ट आहे, जो 172 bhp चा पावर आणि 400 Nm चा पिक टॉर्क प्रोड्यूस करतो. ट्रान्समिशन मध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आणि टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक युनिट दिलेला आहे. याव्यतिरिक्त ग्राहक, कष्टमाइज फ्रंट आणि रीयर आर्मरेस्ट, फ्लोअर मॅट आणि कंफर्ट किटच्या रूपामध्ये ॲक्सेसरीज चा ऑप्शन निवडू शकतात.

Mahindra Thar Earth Edition FAQ:

Q : Mahindra Thar Earth Edition चा मायलेज किती आहे?

Ans : महिंद्रा थारचा पेट्रोल इंजनचा सर्टिफाइड मायलेज 15.2 KM/L आहे, तर डिझेल इंजिनचा मायलेज 13 KM/L आहे.

Q : Mahindra Thar Earth Edition कलर?

Ans : यामध्ये एकच कलर Desert Fury उपलब्ध आहे.

Q: Mahindra Thar Earth Edition किंमत किती आहे?

Ans : महिंद्रा थार अर्थ एडिशन ची पुण्यात किंमत ही 17 लाख रुपये आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment