Ather Rizta Family इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग टाईम, किंमत,160Km ची रेंज आणि जाणून घ्या महत्त्वाचे फीचर्स

Ather Rizta Family Electric Scooter
Ather Rizta Family Electric Scooter

Ather Rizta Family Electric Scooter: Ather Energy ने भारतीय बाजारात आपली पहिली फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर Ather Rizta दाखल केली आहे. कंपनीने आपली Ather Rizta न्यू फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर विशेष करून भारतीय फॅमिली ची गरज बघून डिझाईन केलेली आहे. Ather Rizta मध्ये 56 लिटरचा स्टोरेज स्पेस दिलेला आहे. यामध्ये आपण आपले खूप सारे महत्त्वाचे सामान ठेवू शकतो. कंपनीने या फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटरला केवळ 1,09,999 रुपये च्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किंमत मध्ये लॉन्च केलं आहे.

Ather Rizta ला कंपनीने दोन व्हेरीएंट मध्ये Rizta S आणि Rizta Z मध्ये दाखल केले आहे. या गाडीला अलग अलग बॅटरी पॅक सोबत बाजारात आणले गेले आहे. या स्कूटरमध्ये कमालीच्या टेक्निक आणि फीचर्स दिलेले आहेत. हा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर चालक आणि सहयात्री दोघांनाही चांगला सीटिंग स्पेस प्रदान करतो. या व्यतिरिक्त हा स्कूटर स्टोरेज स्पेसच्या मामल्यात सुद्धा जास्त प्रॅक्टिकल आहे. Ather Rizta च्या किंमत, loan details, रेंज आणि इतर बाबींची माहिती बघुयात.

Ather Rizta Family Electric Scooter Price and Loan Details

Ather Rizta Electric Scooter price

Ather Rizta आपल्याला तीन व्हेरियंट मध्ये मिळणार आहे. त्यांच्या एक्स-शोरूम किमती या खालील प्रमाणे आहेत.

  • Rizta S ची एक्स-शोरूम किंमत 1,09,999 रुपये आहे. ही स्कूटर 80 km/h चा टॉप स्पीड देते. यात तीन कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.
  • Rizta Z पहिल्या व्हेरीएंटची किंमत 1,24,999 रुपये आहे, तर टॉप व्हेरीएंटची किंमत 1,44,999 रुपये आहे. हे दोन्ही व्हेरीएंट 7 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांची टॉप स्पीड 80 km/h आहे.

जर आपण ही इलेक्ट्रिक स्कूटर EMI द्वारे खरेदी करू इच्छित असाल, तर Ather Rizta च्या तीनही व्हेरियंटच्या EMI आणि डाऊन पेमेंट रक्कम खाली टेबल मध्ये दिलेल्या आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण Ather Rizta च्या शोरूम ला किंवा ऑनलाईन संपर्क करू शकता.

Ather Rizta Down Payment and EMI

Rizta Variant  Loan @ 9.7% Down Payment  EMI (36 Months)
Z – 3.7 kWh 1,35,774 ₹15,086 ₹4,365
Z – 2.9 kWh 1,17,453 ₹13,050 ₹3,775
S 1,03,711 ₹11,524 ₹3,317

Ather Rizta Family Electric Scooter Features

Ather Rizta Electric Scooter specifications

 Ather Rizta च्या दोन्ही व्हेरीएंट मध्ये कमालीचे फीचर्स बघायला मिळतात. Rizta S मध्ये कंपनीने डॅशबोर्डवर 7.0 इंचाचा नॉन-टच डीपव्यु डिजिटल डिस्प्ले दिलेला आहे. जो 450 S मध्ये बघितला गेला आहे. Z वेरियंटमध्ये 7.0-इंचाचा TFT टचस्क्रीन डिस्प्ले सोबत येतो. जसाकी 450 X इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये बघितला गेला आहे. याव्यतिरिक्त Rizta इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये टेलिस्कोपिक फोर्क, 12-इंच फ्रंट व्हील आणि फ्रंट डिस्क ब्रेक, सोबतच स्कूटर मध्ये सेक्युरिटी कव्हर आणि एक रॅपराउंड एलईडी टेललाईट सुद्धा दिलेला आहे.

Ather Rizta Family Electric Scooter Battery Storage and Range

Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन मॉडेल आहेत, जे तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. Rizta S आणि Rizta Z चे दोन व्हेरियंट आहेत. यामध्ये अलग-अलग बॅटरी पॅक आहेत. Riztab S मध्ये छोटा बॅटरी पॅक 2.9KWh दिलेला आहे. जो सिंगल चार्ज मध्ये 123 किलोमीटर ची रेंज देतो. Rizta Z पहिला व्हेरियंट मध्ये सुद्धा 2.9kWh बॅटरी पॅक आहे, जो 123 किलोमीटरची रेंज देतो. Riztab Z चा दुसरा व्हेरीएंट मध्ये 3.7KWh बॅटरी पॅक आहे. हा व्हेरियंट सिंगल चार्ज मध्ये 160 KM चि रेंज देतो.

IP67 रेटिंग सोबत येणाऱ्या बॅटरी पॅक ची वॉटर वेडिंग कॅपॅसिटी 400 मीमी आहे. म्हणजेच हा इलेक्ट्रिक स्कूटर आपण कुठल्याही प्रकारच्या रोड कंडिशनवर आरामात ड्राईव्ह करू शकतो. Ather Rizta च्या बॅटरी बद्दल एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ट्विटरवर या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ड्रॉप टेस्ट चा एक व्हिडिओ उपलब्ध आहे. यामध्ये क्रेनच्या स्लाइडरला 40 फूट उंचावरून या स्कूटरच्या बॅटरीला खाली फेकले जाते. तरीसुद्धा Ather Rizta ची बॅटरी सुरक्षित राहते.

अशा प्रकारे आपण एका चांगल्या फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर च्या शोधात असाल, ज्यामध्ये चांगल्या प्रकारची बुट स्पेस मिळणार आहे आणि चांगली रेंज सुद्धा उपलब्ध असणार आहे, तर Ather Rizta न्यू फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर आपल्यासाठी एक चांगला पर्याय असणार आहे.

Ather Rizta फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर FAQ

Q : Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग टाईम?

Ans : या इलेक्ट्रिक स्कूटरला 0-80% चार्जिंग करण्यासाठी 6 तास 40 मिनिटे (350W charger) वेळ लागतो.

Q : Ather Rizta ची टॉप स्पीड किती आहे?

Ans : 80 kmph

 Q : Ather Rizta ची एक्स शोरूम प्राईस किती आहे?

Ans : इलेक्ट्रिक स्कूटर ची प्राईज रेंज 1.10 लाख ते 1.45 लाख रुपये आहे.

Q : Ather Rizta मध्ये किती बॅटरी ऑप्शन्स आहेत?

Ans : यात आपल्याला दोन 2.9kWh आणि 3.7kWh बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment