
BYD Seal EV Price in India and Specifications in Marathi: चिनी कंपनी BYD ने आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. सिंगल चार्ज मध्ये 650 किलोमीटरची रेंज देणारी ही एसयुव्ही बीवायडी इलेक्ट्रिक कार आहे. सील SUV EV ही कार तीन व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे आणि तिची सुरुवातीची किंमत 41 लाख रुपये आहे.
BYD Seal EV on road Price
भारतीय बाजारात BYD Seal EV तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या एक्स-शोरूम किमती 41 लाख रुपयांपासून सुरू होतात. Seal EV इलेक्ट्रिक कारच्या डायनामिक मॉडेल्सची एक्स-शोरूम किंमत 41 लाख रुपये आहे. तर BYD Seal प्रीमियम व्हर्जन ची एक्स-शोरूम किंमत 45.5 लाख रुपये आहे. या कारच्या परफॉर्मन्स व्हेरीएंटची एक्स-शोरूम किंमत 53 लाख रुपये आहे.
BYD Seal EV डायनामिक व्हेरियंटची पुण्यात ऑन रोड किंमत ही 43,31,726 रुपये आहे. या किमतीमध्ये एक्स-शोरूम प्राईज, इन्शुरन्स आणि आरटीओ रजिस्ट्रेशन समाविष्ट आहे.
BYD Seal EV चे महत्वाचे वैशिष्ट्य

सील इव्ही एसयूव्ही कारला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेला आहे. या SUV ला अनेक सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत. जसेकी, यामध्ये ड्युअल फ्रंट एअर बॅग, सीटबेल्ट रिमाइंडर, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग. आणखी ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि एअर बॅग कट-ऑफ स्विच या सर्व सुविधा या कारमध्ये आहेत. या इलेक्ट्रिक कारची टॉप स्पीड 180 km/h कीमी प्रीती घंटा आहे.
BYD Seal EV Design and Features – सील इव्हीचे फीचर्स आणि डिझाईन
BYD कंपनीने आपली नविन कार स्टायलिश डिझाईन, पावरफुल इंजिन आणि फीचर्सने सुसज्ज असलेली सील इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या इव्हीच्या डिझाईन बद्दल सांगायचं झालं तर, या कारमध्ये बीवायडीची ‘ओशन एस्थेटिक्स’ डिझाईन आहे. ही कार 4800 mm लांब, 1875 mm रुंद आणि 1460 mm उंच आहे. या कारला एरोडायनामिक बॉडी आहे आणि मागील बाजूस असलेले पूर्ण विस्तृत एलईडी लाईट खूपच आकर्षक आहेत.
या कारच्या फीचर्स मध्ये आपल्याला एलईडी हेडलॅम्प, फुल एलइडी टेललायटिंग, बुमरँग आकाराचे एलईडी डीआरएल. सोबतच्या या इलेक्ट्रिक SUV मध्ये 15.6-इंचाचा रोटेटिंग टच स्क्रीन इन्फोटेंमेंट पॅनल,10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, सॉफ्ट टच मटेरियलचे केबिन आणि वायरलेस चार्जिंग पॅड दिलेले आहेत.
BYD Seal EV रेंज आणि बॅटरी पॅक
सील ईव्ही मध्ये आपल्याला दोन बॅटरी पावर ऑप्शन उपलब्ध आहेत. या कारच्या पावरट्रेनमध्ये एक 61.4 KWh चा बॅटरी पॅक आहे आणि दुसरा 82.5 KWh चा बॅटरी पॅक आहे. परफॉर्मन्स व्हेरियंटमध्ये दोन इंजिन एकाच वेळी वापरण्यात येत आहेत. यामुळे हे इंजिन 522 bhp चा पावर आणि 670 Nm चा पिक टॉर्क जनरेट करते. तसेच डायनामिक व्हेरिएंट मध्ये 201 bhp पावर आणि 310 एनएम चा टॉर्क निर्माण केला जातो.
या कारच्या रेंज बद्दल सांगायचं तर, डायनामिक व्हेरिएंट एका सिंगल चार्ज मध्ये 510 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. तर प्रीमियम वेरियंटची रेंज ही सर्वाधिक 650 किमी पर्यंत आहे. आणि परफॉर्मन्स वेरीएंटची रेंज 580 किमी पर्यंत आहे. तसेच ही कार फक्त 3.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटरची स्पीड पकडू शकते. डायनामिक वेरियंटमध्ये रियर व्हील ड्राईव्ह, तर प्रीमियम व्हेरीएंट सील इव्ही मध्ये ऑल व्हील ड्राईव्ह पावर ट्रेन देण्यात आले आहे.
BYD Seal EV FAQ:
Q : सील इव्हीचा चार्जिंग टाईम किती आहे?
Ans : 150 KW चार्जर सह आलेल्या सील ईव्हीला 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 37 मिनिटे वेळ लागतो.
Q : सील इव्हीची स्पर्धा मार्केटमध्ये कुठल्या कार सोबत होणार आहे?
Ans : या कारला थेट स्पर्धा नाही. परंतु किमतीच्या बाबतीत या कारची स्पर्धा Hyundai Ioniq 5 आणि Kia च्या EV शी असणार आहे.
Q : सील इव्ही एसयुव्हीची ऑन रोड किंमत किती आहे?
Ans : पुण्यात सील इव्हीच्या डायनामिक वेरियंटची ऑन रोड किंमत ही 43,31,726 रुपये आहे.