Hero Surge S32 Price in India & Specifications in Marathi: सर्ज Hero MotoCorp ची एक सबसिडरी कंपनी आहे.Surge S32 हे जगातील पहिले क्लास-शिफ्टिंग वाहन आहे. या EV ला कंपनीने हिरो वर्ल्ड 2024 मध्ये शोकेस केलं आहे. Hero Surge S32 हे 2 in 1 electric vehicle आहे. या EV ला दोन प्रकारे वापरात आणल्या जाते एक थ्री-व्हीलर कार्गो म्हणून आणि दुसरे टू-व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून.
Hero Surge S32 एक युनिक convertible electric vehicle आहे. या गाडीच्या 2 in 1 फिचर्स ने सर्वांनाच आकर्षित केलं आहे. आपण आपल्या सोयीनुसार टू-व्हीलर किंवा थ्री-व्हीलर वापरू शकतो. हे केवळ तीन मिनिटात एका पुश बटन वर होणार आहे. ही भन्नाट गाडी नेमकी कशी आहे? या गाडीची किंमत किती आहे? आणि या गाडीचे फीचर्स कसे आहेत? पाहुयात
Hero Surge S32 Design
Hero Surge S32 च्या डिझाईन बद्दल सांगायचे झाले तर हे एक convertible electric rickshaw आहे. केवळ तीन मिनिटात या गाडीला आपण इलेक्ट्रिक कार्गो किंवा रिक्षामधून इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये कन्व्हर्ट करू शकतो.
Surge S32 च्या कार्गो किंवा रिक्षाच्या डिझाईन बद्दल सांगायचं झालं तर सिम्पल आणि युनिक डिझाईन आहे. इलेक्ट्रिक स्कूटर चा विचार केला तर हिरोचे इलेक्ट्रिक स्कूटर दिसायला खूपच attractive आहे.
Surge S32चा लोक आपल्या आवश्यकतेनुसार वापर करू शकतात. जर आपल्याला सामान लोड करायचा असेल, तर आपण या इलेक्ट्रिक व्हेईकलचा कार्गो म्हणून वापरू शकतो आणि स्कूटर म्हणून वापर करायचा असेल तर, या गाडीला इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून सुद्धा सोप्या पद्धतीने वापरात आणता येते. या सर्व गोष्टी केवळ एका पुश बटनच्या साह्याने केल्या जातील.
Hero Surge S32 Features
Hero Surge S32 मध्ये युनिक आणि फ्युचरेस्टिक फीचर्स मिळतात. आपण दोन प्रकरे या electric vehicle ला उपयोगात आणू शकतो एक म्हणजे इ-स्कूटर म्हणून आणि दुसरा आपण इलेक्ट्रिक-कार्गो म्हणून वापर करू शकतो.
या EV ला आपण केवळ तीन मिनिटात टू-व्हीलर मधून थ्री-व्हीलर कार्गो मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. या EV मध्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सोबत रिव्हर्स गिअर, LED Headlights, सोबतच कार्गोमोडमध्ये चांगल्या प्रकारचा स्पेस बघायला मिळतो. ज्याचा वापर आपण समानाचे नेआन करण्यासाठी करू शकतो. कार्गो मोडमध्ये ही EV 400 kg पर्यंत वजन वाहून नेण्याची कॅपॅसिटी ठेवते. यामध्ये आपल्याला सामान ठेवण्यासाठी बऱ्यापैकी स्पेस उपलब्ध होणार आहे.
Hero Surge S32 Battery
Hero Surge S32 च्या परफॉर्मन्स मध्ये बॅटरीचा सर्वात महत्त्वाचा रोल आहे. Surge S32 convertible electric rickshaw मध्ये दोन अलग-अलग बॅटरी आहेत.
कन्वर्टिबल EV vehicle च्या कार्गो मोड मध्ये अलग बॅटरी आणि इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये एक अलग बॅटरी बसवण्यात आली आहे. इलेक्ट्रिक व्हेहीकलच्या थ्री-व्हीलर कार्गो मध्ये 11 KW ची बॅटरी बघायला मिळते सोबतच टू-व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3.5 KW पावरची बॅटरी आहे.
The Hero #Surge S32! #HeroWorld #PowerDrift #PDArmy @heromotocorp pic.twitter.com/QkevFxfZga
— PowerDrift (@PowerDrift) January 25, 2024
Hero Surge S32 Motor & Range
हिरो surge S32 मार्केटमध्ये एक युनिक 2 in 1 डिझाईन सोबत आलेला आहे. Surge S32 मध्ये दोन मोड दिलेले आहेत एक कार्गो मोड आणि दुसरा स्कूटर मोड आहे. या इलेक्ट्रिक vehicle च्या स्कूटर मोड मध्ये 3 kW ची मोटर आहे. ज्याची रेंज 60 किलोमीटर पर्यंत बघायला मिळते.
Surge S32 इलेक्ट्रिक वेहिकलच्या कार्गो मोड मध्ये 10 kW पावरची मोटर आहे ज्याची रेंज 50 किलोमीटर पर्यंत असेल.
Hero Surge S32 EV Specifications
कंपनीच्या म्हणण्यानुसार या कन्वर्टिबल इलेक्ट्रिक vehicle ला थ्री-व्हीलर मधून टू-व्हीलर मध्ये रूपांतरित होण्यासाठी केवळ 3 मिनिटे लागतात. कंपनी द्वारे हिरो सर्ज S32 चे एकूण चार प्रकार लॉन्च होणार आहेत, ज्यामध्ये S32 PV, S32 LD, S32 HD आणि S32 FB. S32 LD हिरो वर्ल्ड 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे.
Name of E vehicle | Hero Surge S32 |
Hero Surge S32 Price In India | 2 Lakhs To 3 Lakhs Rupees (Estimated) |
Category | 2 in 1 Convertible EV |
Mode | Electric ScooterCargo Mode |
Battery | 11 KW (Cargo), 3.5 KW (Electric Scooter) |
Motor | 3 KW Motor (Electric Scooter), 10 KW (Cargo Mode) |
Launch Date | Not Confirmed |
Features | Digital instrument cluster, LED headlights, Bluetooth connectivity, reverse gear |
Rivals | At Present No Rival |
Hero Surge S32 Price in India (Expected)
नक्कीच अशा प्रकारचं युनिक वेहिकल मार्केटमध्ये आल्यावर आपल्याला त्याची प्राईस जाणून घेण्याची आतुरता होते. Hero द्वारे अजून पर्यंत Surge S32 च्या प्राईस बद्दल अधिकृत माहिती दिली नाही. परंतु काही मीडिया रिपोर्टच्या नुसार या इलेक्ट्रिक वेहिकल ची किंमत 2,50,000 ते 3,00,000 रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक असू शकते.
Hero Surge S32 Launch Date in India (Expected)
हिरो ने या कान्व्हर्टेबल EV ला 2024 च्या हिरो वर्ल्ड मध्ये अनावरण केलं आहे. हिरोनी मार्केटमध्ये स्वतःचे नवीन कन्वर्टिबल e vehicle शोकेस केले आहे. यामध्ये हिरो सर्जच्या लॉंच डेटचा विचार केला तर Hero MotoCorp ने अजून पर्यंत हिरो Surge S32 च्या लॉंच डेट बद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. तरीसुद्धा हिरो वर्ल्ड मध्ये अनावरण केल्यामुळे लवकरच हे इलेक्ट्रिक vehichle मार्केटमध्ये लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे.
Hero Surge S32 Mileage
Hero Surge S32 Convertible EV मध्ये असलेल्या कार्गो आणि स्कूटर मोड साठी दोन अलग अलग मोटर बसवलेले आहेत. त्यामुळे सर्ज S32 च्या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये एका सिंगल चार्ज मध्ये 60 कीलोमीटर चा मायलेज मिळणार आहे आणि इलेक्ट्रिक कार्गो किंवा रिक्षामध्ये 50 किलोमीटरचा मायलेज प्राप्त होणार.