
Hyundai Venue Executive Turbo Variant Price in India: भारतात हुंडाई कारची सर्वात जास्त क्रेझ आहे. होंडाई कंपनीकडून होंडाई व्हेनयु एक्झिक्युटिव्ह चा नवीन मिड-स्पेक टर्बो व्हेरियंट लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने या एसयूव्ही व्हेरिएंटला (Venue Executive) व्हेनयू एक्झिक्यूटिव्ह असे नाव दिले आहे. 2024 मध्ये नवीन हुंडाई वेन्यू एक्झिक्यूटिव्ह व्हेरियंट ची एक्स-शोरूम किंमत फक्त 9.99 लाख रुपये आहे.
याच इंजिन ऑप्शनसह येणाऱ्या व्हेनयु S(O) व्हेरियंट पेक्षा हे मॉडेल 1.75 लाख रुपयांनी स्वस्त आहे. Venue Executive च्या लाँचमुळे लोकांना आता टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज एसयूव्ही खरेदी करणे सोपे होणार आहे. या कारमध्ये आपल्याला 16-इंचचे ड्युअल स्टाईल व्हील्स, फ्रंट ग्रीलवर गडद क्रोम आणि टेलगेटवर ‘एक्झिक्यूटिव्ह’ बॅज दिसून येत आहे. व्हेनयू एक्झिक्यूटिव्ह कार मध्ये कोणकोणते फीचर्स आणि वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
Venue Executive On road Price – टर्बो वेरिएंटची ऑन रोड किंमत
होंडाई व्हेनयू Executive 1.0 Turbo MT हे पेट्रोल व्हेरियंट आहे. Venue Executive टर्बो वेरिएंट ची पुण्यात ऑन रोड किंमत 11,66,412 रुपये आहे. यामध्ये एक्स-शोरूम किंमत, आरटीओ आणि विमा शुल्क समाविष्ट आहे. ही कार आपल्याला 6 कलर ऑप्शन मध्ये बघायला मिळणार आहे. यात मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे.
Venue Executive ची वैशिष्ट्ये
Venue Executive टर्बो व्हेरियंट मध्ये आपल्याला 350 लिटर्स बुटस्पेस मिळणार आहे. या कारच्या इंधन टाकीची क्षमता 45 लिटर आहे.
Venue Executive टर्बो व्हेरिएंट इंजिन | 998 cc, 3 सिलेंडर इनलाईन, 4 वॉल/सिलेंडर, डीओएचसी |
इंजिनचा प्रकार | 1.0 कप्पा टर्बो जीडीआय |
व्हील बेस | 2500 mm |
ग्राउंड क्लिअरन्स | 195 mm |
सीटिंग कॅपॅसिटी | 5 व्यक्ती |
फ्यूल टॅंक कॅपॅसिटी | 45 लिटर्स |
Venue Executive चा मायलेज आणि टॉप स्पीड
हुंडाईने Venue Executive टर्बो व्हेरिएंट मध्ये 998 cc पावरचा दमदार इंजन दिलेला आहे. या कारच्या मायलेज बद्दल सांगायचं झालं तर, कंपनीच्या म्हणण्यानुसार या कारचा सर्टिफाईड मायलेज हा 20.36 kmpl कीमी प्रति लिटर आहे. या कारची मॅक्झिमम टॉप स्पीड ही 165 kmph आहे.
Venue Executive Features – व्हेनयू एक्झिक्युटिव्ह चे फीचर्स

व्हेनयू एक्झिक्यूटिव्ह 1.0 टर्बो पेट्रोल व्हेरियंट मध्ये अनेक खास फीचर्स आहेत. यामध्ये टू-स्टेप रीक्लायनिंग आणि 60:40 स्प्लिट फोल्डिंग रिअर सीट्स, 8.0 इंचच्या इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड, ऑटो एप्पल कारप्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूज कंट्रोल असे अनेक फीचर्स चा समावेश आहे.
सोबतच आणखी एक्झिक्युटीव्ह मध्ये 6 एअर बॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, मागील बाजूस एसी वेंटस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि मागील बाजूस असलेला एक्झिक्युटिव्ह लोगो असे महत्त्वाचे फीचर्स आहेत.
Venue Executive टर्बो वेरियंट इंजिन पावर
हुंडाई इंडियाने Venue Executive 1.0 टरबो पेट्रोल व्हेरियंटमध्ये 998 cc, 1.0 लिटर थ्री पॉट जीडीआय टर्बो पेट्रोल इंजन दिलेला आहे. हे इंजन 6000 rpm वर 118 bhp चा पावर आणि 1500 rpm वर 172 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही कार मार्केटमध्ये रेनॉल्ट कीगर टर्बो आणि निसान मॅग्नाइट टर्बोशी स्पर्धा करणार आहे.
Venue Executive ब्रेक्स आणि सस्पेन्शन:
या कारमध्ये आपल्याला सस्पेन्शन साठी समोरच्या बाजूला कॉयल स्प्रिंग सोबत मेकफर्सन स्ट्रट आणि मागच्या बाजूला कॉइल स्प्रिंग सोबत कपल्ड टोर्शन बिम एक्सल सस्पेन्शन दिलेला आहे. आणि ब्रेकिंग मध्ये फ्रंट साठी डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक उपलब्ध आहे.
ब्रेकिंग च्या फीचर्स मध्ये आपल्याला अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स इबीडी, ब्रेक असिस्ट सारख्या सुविधा आहेत. सोबतच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल आणि ट्रेक्शन कंट्रोल सारखे फीचर्स सुद्धा आहेत.
Venue Executive टर्बो व्हेरिएंट FAQ:
Q : व्हेनयू एक्झिक्यूटिव्ह टर्बो वेरिएंट मध्ये किती कलर ऑप्शन आहेत?
Ans : या कारमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत; Abyss Black, Denim Blue, Titan Grey, Typhoon Silver, Fiery Red, Atlas White.
Q : Venue Executive 1.0 Turbo MT ची ऑन रोड किंमत किती आहे?
Ans : पुण्यात या गाडीची ऑन रोड किंमत ही 11.66 लाख रुपये आहे.
Q : Venue Executive चा मायलेज किती आहे?
Ans : या कारचा सर्टिफाइड मायलेज 20.36 कीमी प्रति लिटर आहे.