महिंद्रा ने आपली नवी कोरी SUV कार XUV 3XO भारतात लॉन्च केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 7.49 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. ही कार एएक्स आणि एमएक्स अशा दोन व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. यात इंजन ऑप्शन नुसार अलग-अलग मॉडेल्स आहेत. आपण ही कार फायनान्स द्वारे खरेदी करू इच्छित असाल, तर आम्ही आपल्यासाठी बेस्ट EMI प्लान बद्दल माहिती देणार आहोत.
सोबतच महिंद्रा कंपनीने आपल्या Mahindra XUV 3XO मध्ये काय खास फीचर्स दिली आहेत आणि या गाडीची डिझाईन कशी आहे त्याबद्दल सुद्धा विस्तृत माहिती बघणार आहोत. महिंद्राने ही SUV गाडी एप्रिल 2024 मध्ये लॉन्च केली आहे.
Mahindra XUV 3XO डाऊन पेमेंट आणि लोन डिटेल्स

जर तुम्ही Mahindra XUV 3XO चे बेस मॉडेल नगद खरेदी केले, तर ते आपल्याला 8.42 लाख रुपये किमतीमध्ये पडेल. पण जर तुम्हाला डाऊन पेमेंट करून फायनान्स द्वारे खरेदी करायची असेल. तर त्यासाठी आपल्याला 1,50,000 रुपयांचे डाऊन पेमेंट करून उर्वरित रक्कम 6,91,750 रुपयांसाठी ही गाडी फायनान्स करावी लागेल.
या कर्जाचा कालावधी हा 5 वर्षासाठी असेल, ज्यामध्ये बँकेचा वार्षिक व्याजदर 9.50% असेल. त्यानुसार या SUV चा मासिक EMI प्लान हा 14,360 रुपये राहील. म्हणजेच सर्व हप्त्यांसह एकूण 8,61,600 रुपये आपल्याला बँकेत भरावे लागतील.
XUV 3XO बेस मॉडेल किंमत आणि डिझाईन
महिंद्रा XUV 3XO बेस मॉडेल MX1 1.2-L TCMPFi व्हेरियंट ची एक्स-शोरूम किंमत 7,49,200 रुपये आहे. तर ऑन रोड किंमत ही 8,41,750 रुपये आहे. यामध्ये आरटीओ, इन्शुरन्स आणि इतर चार्जेस समाविष्ट आहेत.
या कारच्या डिझाईन बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये समोरच्या बाजूला नवीन डिझाईन असलेले ग्रील मिळते. सोबतच इंटिग्रेटेड डीआरएल लाइट्स आणि मागील बाजूस बंपर इंटिग्रेटेड रजिस्ट्रेशन प्लेट, फुल वाईड एलईडी लाईट बार आणि स्लिकर सी-आकाराचे टेल लॅम्पसह अपडेटेड टेलगेट डिझाईन केलेले मिळणार आहे.
इंजन परफॉर्मन्स
यास SUV कार मध्ये आपल्याला 1.2-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजन ऑप्शन्स देण्यात आले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार या कारचा पिकअप अतिशय चांगला आहे, ज्यामध्ये फक्त 4.5 सेकंदात ही कार 0-60 किमी प्रति घंट्याचा स्पीड घेईल.
Mahindra XUV 3XO चे एन्ट्री लेवल पेट्रोल व्हेरीएंट मध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजन ऑप्शन दिला आहे. जो 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्वर्टर ट्रान्समिशनने सुसज्ज असेल. या कारच्या मेन्यूअल व्हेरीएंटचा मायलेज 18.89 किमी/लिटर आणि ऑटोमॅटिक व्हेरीएंटचा मायलेज 17.96 किमी/लिटर असणार आहे.
दुसरे 1.5-लीटर डिझेल इंजन दिलेले आहे. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडले गेले आहे. डिझेलचे मॅन्युअल व्हेरीएंट 20.6 किमी/लिटर मायलेज देईल आणि ऑटोमॅटिक 21.2 किमी/लिटर पर्यंत मायलेज देणार आहे.
केबिन आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीने या कारच्या केबिनला प्रीमियम टच दिला आहे. सोबतच नवीन डिझाईन असलेले डॅश बोर्ड, 10.25-इंचचा इन्फोटेनमेंट सिस्टम आणि उत्तम दर्जाचे सराऊंड साऊंड स्पीकर देण्यात आला आहेत.
सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे या कार मध्ये दिलेले रिमोट क्लायमेट कंट्रोल फीचर. जे Adrenox ॲपवरून ऑपरेट केले जाईल. यामध्ये फोनवरूनच कारच्या केबिनचे तापमान नियंत्रित केले जाईल.
याव्यतिरिक्त न्यू लॉन्च महिंद्रा XUV 3XO मध्ये ॲपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प सारखे सुविधा बघायला मिळतील.
महिंद्रा XUV 3XO सेफ्टी फीचर्स
सेफ्टी फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर, या कारच्या सर्वच व्हेरियंट मध्ये 6 एअरबॅग, रीयर डिस्क ब्रेक, ESP आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर सुविधा उपलब्ध आहेत.
XUV 3XO टॉप व्हेरिएंट मध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि ऑटो-होल्ड, हिल-स्टार्ट आणि हिल डिसेंट असिस्टसह लेवल 2 ADAS यांसारखे महत्त्वाचे वैशिष्ट्ये या गाडीमध्ये बघायला मिळणार आहेत.
FAQ:
Q : Mahindra XUV 3XO च्या बेस मॉडेलची ऑन रोड किंमत किती आहे?
Ans : 8,41,750 रुपये.
Q : Mahindra XUV 3XO चा मायलेज किती आहे?
Ans : 20.6 kmpl.
Q : Mahindra XUV 3XO सिटींग कॅपॅसिटी किती आहे?
Ans : 5