2024 New MG Hector Blacktorm Edition Price, Mileage, Features : किंमत 21.24 लाख रुपयांपासून सुरू


MG Hector Blacktorm Edition Price in India

एमजी मोटार इंडिया ने एसयुव्ही क्षेत्रात आपली जागा प्रस्थापित  करण्यासाठी भारतीय बाजारपेठेत हेक्टर नावाने ‘ब्लॅकस्टॉर्म डार्क एडिशन’ दाखल केले आहे. एमजी हेक्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशन कार आपल्याला 5,6 आणि 7 सीट ऑप्शन मध्ये बघायला मिळणार. या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 21.24 लाख रुपये आहे. या गाडीमध्ये दोन इंजन ऑप्शन्स 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजन आणि 2.0-लीटर डिझेल इंजन दिलेले आहे. या कारच्या पेट्रोल व्हेरीएंट चा मायलेज 12.34 kmpl आहे आणि फ्युएल टॅंक कॅपॅसिटी 60 लिटरची आहे.

एमजी हेक्टरने ही गाडी लॉन्च करून एसयुव्ही मार्केटमध्ये आपला दबदबा प्रस्थापित केला आहे. या गाडीच्या पेट्रोल व्हेरियांट ची टॉप स्पीड 185 km/h आहे, तर डिझेल व्हेरीएंट ची टॉप स्पीड 180 km/h आहे. हेक्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशन मध्ये आपल्याला ऍडव्हान्स फीचर, स्ट्रायकिंग डिझाईन आणि पावरफुल परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत. लक्झरी इंटेरियर, एक्सटेरियर आणि कटिंगएज टेक्नॉलॉजी यासारख्या सर्वच गोष्टीने समृद्ध असलेल्या या एसयूव्ही कारने मार्केटमध्ये आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. या गाडीच्या व्हेरिअंटवाईज किमती आणि फीचर्स बद्दल जाणून घेऊयात.

New MG Hector Blacktorm Edition Price in India and Rivals

एमजी हेक्टर ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 21.24 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरीएंटची एक्स-शोरूम किंमत 22.75 लाख रुपये पर्यंत जाते. या गाडीच्या व्हेरियंट नुसार एक्स-शोरूम किमती खालील प्रमाणे आहेत. ब्लॅक स्टॉर्म CVT ची ऑन रोड किंमत ही 25,13,225 रुपये आहे. यात एक्स-शोरूम प्राईस, आरटीओ, इन्शुरन्स आणि इतर चार्जेस समाविष्ट आहेत.

व्हेरियंट एक्स-शोरूम प्राईज
MG Hector Blacktorm Edition 1.5 पेट्रोल CVT (5-Seat) 21.24 लाख रुपये
MG Hector Blacktorm Edition 2.0 Diesel MT (5-Seat) 21.94 लाख रुपये
MG Hector Blacktorm Edition 1.5 पेट्रोल CVT (7 Seat)  21.97 लाख रुपये
MG Hector Blacktorm Edition 2.0 Diesel MT (7 – Seat) 22.54 लाख रुपये
MG Hector Blacktorm Edition 2.0 Diesel MT (6 Seat) 22.75 लाख रुपये

मार्केटमध्ये या गाडीचा सामना हुंडाई क्रेटा एन लाईन, किया सेल्टोस एक्स लाईन, टाटा हॅरियर डार्क, ओक्सवॅगन टायगन जीटी लाईन, एमजी ऍस्टर ब्लॅकस्टॉर्म आणि स्कोडा कुशाक गाड्यांसोबत असणार आहे.

MG Hector Blacktorm Edition Features

mg hector blackstorm edition specification
mg hector blackstorm edition specification

या गाडीमध्ये आपल्याला शानदार फीचर्स बघायला मिळणार आहेत. जसे की,

  • 14.0 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम.
  • वायरलेस एप्पल कारप्ले/अँड्रॉइड ऑटो.
  • कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी.
  • 7.0 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर.
  • 360 डिग्री कॅमेरा.
  • व्हेंटिलेटेड सीट्स आणि इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट.
  • ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल.

आणि सेफ्टी फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर, एमजी हेक्टरच्या ब्लॅकस्टॉर्म एडिशन मध्ये आपल्याला 6 एअर बॅग, स्टॅबिलिटी कंट्रोल आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारख्या सुविधा मिळणार आहेत.

एमजी हेक्टर ब्लॅकस्टॉर्म ची महत्वाची इतर वैशिष्ट्ये 

ARAI मायलेज 12.34 kmpl
फ्युएल टॅंक कॅपॅसिटी 60 लीटर
ड्राईव्ह टाईप फ्रंट व्हील ड्राईव्ह
इंजन ऑप्शन डिझेल आणि पेट्रोल
सेफ्टी फीचर्स 6 एअरबॅग, स्टॅबिलिटी कंट्रोल आणि ट्रॅक्शन कंट्रोल
डिजिटल क्लस्टर साईज 7 इंच

MG Hector Blacktorm Edition Engine Performance

या एसयुव्ही कार मध्ये आपल्याला दोन इंजिन पर्याय बघायला मिळणार आहेत. त्यामध्ये पहिला 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजन आहे, जो CVT ट्रान्समिशन सोबत येतो. या इंजन द्वारे 143 bhp चा पावर आणि 250Nm चा टॉर्क जनरेट होतो. दुसरा इंजन ऑप्शन हा 2.0-लीटर डिझेल इंजनद्वारे संचलित आहे. या इंजन द्वारे 170 bhp चा पावर आणि 350Nm चा पिक टॉर्क जनरेट होतो.

MG Hector Blacktorm Edition Interior and Exterior 

Exterior: हेक्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशन च्या एक्सटेरियर मध्ये ब्लॅक थीम सोबत डार्क क्रोम ग्रील, ब्लॅक हेडलॅम्प बेझल्स आणि स्मोक डेडलाईट्स असणार आहेत. सोबतच ORVM, बंपर आणि ब्रेक कॅलिपर वर लाल एक्सेंट डिझाइन असेल.

Interior: या गाडीच्या आतील बाजूस काळ्या रंगाचे इंटिरियर दिलेले आहे. ज्यात लाल एक्सेंट आणि सभोवताली लाइटिंग दिली आहे. सोबतच मेटालिक एक्सेंट डिझाईन असलेले डॅशबोर्ड, सेंटर कन्सोल, एअर व्हेंट्स डोअर पॅनल्स आणि स्टेरिंग व्हील आहेत. हेक्टर ब्लॅकस्टॉर्म मध्ये ब्लॅक लेदर सीट्स दिलेल्या आहेत आणि  हेडरेस्ट वर “ब्लॅकस्टॉर्म” चे प्रतीक चिन्ह आहे.

MG Hector Blacktorm FAQ

Q : एमजी हेक्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशन ची किंमत किती आहे? 

Ans : गाडीची ऑन रोड किंमत 25,13,225 रुपये आहे. त्यामध्ये एक्स-शोरूम प्राईज, आरटीओ, इन्शुरन्स आणि इतर चार्जेस समाविष्ट आहेत.

Q : एमजी हेक्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशन चा मायलेज किती आहे?

Ans : 12.34 kmpl

Q : एमजी हेक्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशन ची टॉप स्पीड किती आहे? 

Ans : पेट्रोल व्हेरीएंटची टॉप स्पीड 185km/h आणि डिझेल व्हेरीएंट ची टॉप स्पीड 180km/h आहे.

 Q : एमजी हेक्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशन गाडीची बूट स्पेस किती आहे? 

Ans : या कारची बूट स्पेस 587 लीटर्स आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment