Tata Nexon Dark Edition Price,Design, Specifications: Nexon चे डार्क एडिशन लाँच! जाणून घ्या काय असेल किंमत आणि फीचर्स

Tata Nexon Dark Edition
Tata Nexon Dark Edition

Tata Nexon Dark Edition Price in Marathi: टाटाच्या सर्वच कार या आपल्या डार्क एडिशन साठी भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट मध्ये डार्क एडिशन variants आले होते. टाटा मोटर्स ने आता नेक्सोन डार्क एडिशन (Tata Nexon Dark Edition) मार्चच्या सुरुवातीलाच सादर करण्याचे सांगितले आहे. हे वर्जन कोणत्या ट्रीम साठी उपलब्ध असेल आणि त्याच्यामध्ये कुठले नवीन फीचर्स असणार आहेत, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Tata Nexon Dark Edition Price in India

Tata Nexon Dark Edition ची किंमत त्याच्या संबंधित नियमित प्रकारांपेक्षा सुमारे 25000 ते 30000 अधिक आहे. मार्चमध्ये लॉन्च होत असलेल्या टाटा नेक्सन डार्क एडिशन ची किंमत ही रुपये 8.15 लाख ते 15.60 लाख रुपयापर्यंत असणार आहे. हे व्हेरियंट टाटाच्या XZ+ Lux S ट्रिम सबकॉम्पॅक्ट SUV वर आधारित असणार आहे.

Tata Nexon Dark Edition on road price
Tata Nexon Dark Edition Price

टाटा नेक्सन सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह प्लस, फीरलेस आणि फिअरलेस प्लस सनरूफसह उपलब्ध असणार आहे.

Tata Nexon Dark Edition Specifications

Tata Nexon Dark Edition Specifications
Tata Nexon Dark Edition Specifications
Tata Nexon Dark Edition मायलेज 17.01 ते 24.08 किमी प्रति लिटर
इंजन 1199 cc ते 1497 cc
सुरक्षा 5 स्टार (ग्लोबल एनकॅप)
इंधन चे प्रकार पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी
ट्रान्समिशन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक
बसायची क्षमता 5 सीटर

Tata Nexon Dark Edition Engine and Performance 

Tata Nexon Dark Edition मध्ये आपल्याला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शन उपलब्ध असणार आहेत. यामध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल,जो 118 bhp चा पावर आणि 170Nm चा टोर्क जनरेट करतो आणि 1.5 लिटर डिझेल इंजन, जो 113 bhp चा पावर आणि 260Nm टॉर्क प्रोड्युस करतो. या कारच्या ट्रान्समिशन मध्ये आपल्याला सहा स्पीड मॅन्युअल, सहा स्पीड ऑटोमॅटिक आणि सात स्पीड डीसिटी गियरबॉक्स (डूएल क्लच ट्रान्समिशन) ट्रान्समिशन युनिट उपलब्ध होणार आहे.

Tata Nexon Dark Edition Features

Nexon Dark Edition चा फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर, या कारमध्ये आपल्याला एलईडी डेटाईम रनिंग लाइट्स, टेल लाईट्स, कीलेस गो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल,10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि ऍपल कारप्ले, 360-डिग्री कॅमेरा, सनरूफ आणि अशी इतर अनेक वैशिष्ट्ये मिळतील.

Tata Nexon Dark Edition Features
Tata Nexon Dark Edition Features

याशिवाय, वायरलेस मोबाइल कनेक्टिव्हिटी, कस्टमाइज करण्यायोग्य डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सनरूफ, एअर प्युरिफायर, JBL-सोर्स्ड ऑडिओ सिस्टम, पॅडल शिफ्टर्स आणि हवेशीर फ्रंट सीट्ससह समान 10.25-इंच टचस्क्रीन मिळेल.

Tata Nexon Dark Edition Interior and Exterior Design

Nexon Dark Edition एक्सटेरियर मध्ये आपल्याला ब्लॅक बंपर आणि ग्रील, डार्क रेल आणि मिश्र धातूंसह पूर्णपणे ब्लॅक आउट एक्सटेरियर फिनिश मिळेल. या कारचा लोगो आणि व्हील्स देखील ब्लॅक असणार आहे.

इंटिरियर मध्ये आपल्याला ब्लॅक-आऊट डॅशबोर्ड, ग्लोस ब्लॅक सेंटर कन्सोल, ब्लॅक लेथरेट अपहोललस्ट्री आणि ब्लॅक रूफ लायनर मिळणार आहे. नेक्सन डार्क एडिशनचा सामना मार्केटमध्ये असलेल्या Hyundai Venue , Maruti Suzuki Brezza , Kia Sonet , आणि Renault Kiger या गाड्यांसोबत सोबत असणार आहे.

हे हि वाचा 

Tata Nexon Dark Edition FAQ: 

Q : Tata Nexon Dark Edition किंमत किती असणार आहे?

Ans : नेक्सन  किंमत 8.15 लाख रुपये पासून सुरु होते ते 15.60 लाख रुपये एक्स शोरूम पर्यंत जातात.

Q : Tata Nexon Dark Edition मध्ये किती इंजन ऑप्शन आहेत?

Ans : या कार मध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजन आणि 1.5 लिटर डिझेल इंजन आहे.

Q : Tata Nexon Dark Edition चा सामना कुठल्या गाड्या सोबत आहे?

Ans : नेक्सन डार्क एडिशनचा सामना Hyundai Venue , Maruti Suzuki Brezza , Kia Sonet , आणि Renault Kiger या गाड्यांसोबत सोबत असणार आहे.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment