
टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारपेठेत इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल व्हेरियंट चे टॉप स्पेक् 8-सीटर GX (O) मॉडेल लॉन्च केले आहे. या MPV कारची किंमत 20.99 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. या कारमध्ये आपल्याला 7-सीटर आणि 8-सीटर पर्याय उपलब्ध असणार आहेत. ज्यांच्या किमती अनुक्रमे 21.13 लाख आणि 20.99 लाख रुपये आहेत. टोयोटा इनोव्हा हाय क्रॉस GX(O) व्हेरियंट साठी 15 एप्रिल 2024 पासून बुकिंग सुरू झाली आहे.
Innova Hycross petrol GX(O): इनोव्हा हायक्रॉस मध्ये 10 हून अधिक ॲडव्हान्स कंफर्ट आणि टेक्नॉलॉजी फीचर्स उपलब्ध असल्याचा कंपनीचा दावा आहे. इनोव्हा हायक्रॉस सर्वाधिक विक्री होणारी MPV कार आहे. या गाडीत बसायला चांगली जागा मिळते आणि लांबच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायी असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात टोयोटाची इनोव्हा हायक्रोस खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अशातच मार्केटमध्ये आलेले हे इनोव्हा हायक्रॉस चे टॉप व्हेरीएंट लोकांना आणखी पसंतीस पडेल. चला तर या गाडीच्या फीचर्स आणि इतर महत्त्वाची वैशिष्ट्य या संबंधित संपूर्ण रिव्यू करूयात.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX(O) पेट्रोल 8 सीटरची किंमत
टोयोटा इनोवा हाय क्रॉस GX(O) मध्ये दोन ऑप्शन्स आहेत. त्यांच्या एक्स-शोरूम किमती खालील प्रमाणे आहेत.
Hycross Petrol GX(O) – 8-Seater: 20.99 लाख रुपये .
Hycross Petrol GX(O) – 7-Seater: 21.13 लाख रुपये.
Hycross Petrol GX(O) – 8-Seater ची ऑन रोड किंमत 24,40,056 रुपये आहे. या ऑन रोड प्राईस मध्ये 2,30,890 चे आरटीओ आणि इतर चार्जेस, 1,10,166 रुपयांचा इन्शुरन्स आणि 20,99,000 एक्स-शोरूम किंमत समाविष्ट आहेत.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX(O) पेट्रोल 8 सीटर चे फीचर्स

कंपनीच्या म्हणण्यानुसार ही गाडी ॲडव्हान्स फीचर्स ने भरपूर आहे. इनोव्हा हायक्रॉस GX(O) मध्ये 10.1-इंचचा इन्फोटेनमेंट टच स्क्रीन, एलईडी फोग लाईट, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर आहेत. सोबतच रियर डीफॉगर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस ॲपल कारप्ले आणि 360 डिग्री कॅमेरा सारखे महत्त्वाचे फीचर्स या गाडीत आहेत. आकर्षक डिझाईन दिसण्यासाठी या कारमध्ये चेस्टनट इंटिरियर थीम, डॅशबोर्ड आणि डोर पॅनलवर सॉफ्ट टच मटेरियल आणि रीयर सन शेड आहे.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX(O) पेट्रोल 8 सीटर इंजन स्पेसिफिकेशन
या कारमध्ये आपल्याला 2.0 लिटर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजन चा पर्याय उपलब्ध आहे. हे इंजन CVT ऑटोमॅटिक गेअर बॉक्सशी जोडलेले आहे. हे इंजन 174 bhp चा पावर आणि 205Nm चा पिक टॉर्क जनरेट करते. इनोव्हा हायक्रॉस GX(O) कारचा मायलेज 16.13 किलोमीटर प्रति लिटर आहे. या MPV कारमध्ये सात एक्स्टेरियर फिनिश कलर ऑप्शन ब्लॅकिश अगेहा ग्लास फ्लेक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल, ॲटिट्यूड ब्लॅक मीका, स्पार्कलिंग ब्लॅक पर्ल क्रिस्टल शाईन, सिल्व्हर मेटॅलिक, सुपर व्हाइट आणि अवंत गार्डे ब्रॉन्झ मेटॅलिक उपलब्ध आहेत.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX(O) पेट्रोल 8 सीटर चे इंटेरियर आणि एक्स्टरियर

या कारच्या इंटरियर बद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये गडद चेस्टनट सॉफ्ट लेदर सीट्स, सॉफ्ट-टच लेदर आणि मेटल डेकोरेशन आहे. एक्सटिरियर डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 16-इंच अलॉय व्हील, एलईडी स्टॉप लॅम्पसह रूफ-एंड स्पॉयलर आणि ऑटो फोल्ड, इलेक्ट्रिक समायोजित आणि टर्न इंडिकेटरसह ORVMs समाविष्ट आहेत. या कारच्या सेफ्टीसाठी यात ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, ऑल व्हील डिस्क ब्रेक, 6 SRS एयरबॅग आणि ISOFIX अँकर आहेत.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX(O) FAQ:
Q : टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX(O) चा मायलेज किती आहे?
Ans : या कारचा मायलेज 16.13 कीमी प्रति लिटर आहे.
Q : टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX(O) ऑन रोड प्राईस किती आहे?
Ans : या गाडीची ऑन रोड किंमत 24,40,056 रुपये आहे.
Q : टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX(O) मध्ये किती कलर ऑप्शन आहेत?
Ans : या कारमध्ये सात कलर ऑप्शन ब्लॅकिश अगेहा ग्लास फ्लेक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल, ॲटिट्यूड ब्लॅक मीका, स्पार्कलिंग ब्लॅक पर्ल क्रिस्टल शाईन, सिल्व्हर मेटॅलिक, सुपर व्हाइट आणि अवंत गार्डे ब्रॉन्झ मेटॅलिक उपलब्ध आहेत.