
अनेक वर्षांपासून मारुती सुझुकी एर्टिगाणे मार्केटमध्ये आपल्या दबदबा कायम ठेवला आहे. टोयोटाने या कंपनीसोबत अंतर्गत करार केला आहे. त्यामुळे आता मारुती एर्टिगा कार टोयोटा कंपनीकडून तयार केली जाणार आहे.
टोयोटा कंपनीच्या विश्वासार्हतेमुळे इनोवा कार गेल्या काही वर्षात खूपच महाग झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत चांगली कार मिळावी म्हणून कंपनीने आपली 7 सीटर रुमिऑन (Rumion MPV) कार मार्केटमध्ये आणली आहे. फीचर्स च्या बाबतीत ही एमपीवी कार अतिशय खास आहे.
रुमिऑन ही कार ‘माईल मंचर’ मानली जाते. कंपनीने विशेष करून या गाडीच्या इंजिन आणि ट्रान्समिशनच्या डिझाईनला विशेष प्राधान्य दिले आहे. टोयोटा रुमिऑन 7 सिटर एमपीव्ही मध्ये स्टार्ट-स्टॉप फीचर दिलं आहे. या कारमध्ये 1.5 लिटर नॅचरली अस्पीरेटेड फोर सिलेंडर पेट्रोल इंजन दिलेला आहे.
ही कार 26 किलोमीटरचा मायलेज देईल असा कंपनीकडून दावा केला जात आहे. या कारला 3 व्हेरीएंट्स आणि 6 ट्रिम्समध्ये सादर करण्यात आले आहे. ही कार लॉन्च केल्यानंतर टोयोटाकडे आता सर्वाधिक एमपीव्ही गाड्या झाल्या आहेत. यामध्ये इनोवा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस, वेलफायर यांचा समावेश असून आता रूमीऑन सहभागी झाली आहे.
Toyota Rumion 7 सीटर MPV on road Price in Mumbai

रुमिऑनच्या मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंट आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटची मुंबईतील एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 10.44 लाख आणि 11.94 लाख रुपयांपासून सुरू होते. रुमिऑनच्या टॉप-एंड व्हेरियंटची किंमत 13.73 लाख रुपये आहे.या कारमध्ये 3 व्हेरीएंट्स आणि 6 ट्रीम्स आहेत त्यांच्या एक्स शोरूम आणि ऑन रोड किमती खाली दिलेल्या टेबल मध्ये आहेत.
व्हेरियंट | एक्स शोरूम प्राईस | ऑन रोड किंमत |
S MT पेट्रोल | 10.44 लाख रुपये | 12.46 लाख रुपये |
S CNG | 11.39 लाख रुपये | 13.09 लाख रुपये |
G MT पेट्रोल | 11.60 लाख रुपये | 13.81 लाख रुपये |
S AT पेट्रोल | 11.94 लाख रुपये | 14.21 लाख रुपये |
V MT पेट्रोल | 12.33 लाख रुपये | 14.66 लाख रुपये |
V AT पेट्रोल | 13.73 लाख रुपये | 16.26 लाख रुपये |
वर दिलेल्या टेबल मध्ये Rumion 7 सीटर कारच्या एक्स शोरूम आणि ऑन रोड किमती दिल्या आहेत. या कारच्या ऑन रोड किमतीमध्ये आरटीओ चार्जेस, इन्शुरन्स आणि एक्स-शोरूम किंमत समाविष्ट आहे.
Toyota Rumion 7 सीटर S MT Variant EMI Down Payment

जर आपल्याकडे एक सोबत कार खरेदी करण्यासाठी पैसे नसतील, तर आपण कार लोन द्वारे ही गाडी खरेदी करू शकता. जर आपल्याला Toyota Rumion 7 सीटर S MT खरेदी करायची असेल तर, त्यासाठी आपल्याला 2.02 लाख रुपयांची डाऊन पेमेंट करावी लागणार आहे आणि उर्वरित रक्कम ही 21,169 रुपये प्रति महिना च्या EMI हप्त्याने 8% व्याज दराने 5 वर्षासाठी भरावी लागणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळील शोरूम ला भेटून EMI संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेऊ शकता.
Toyota Rumion 7 Seater MPV Mileage

टोयोटा कंपनीने या कारमध्ये पेट्रोल इंजिनसह नियो ड्राईव्ह तंत्रज्ञान (इंटिग्रेटेड स्टार्टर जेनरेटर – आयएसजी) आणि सीएनजी ऑप्शन दिलेला आहे. कंपनीचा दावा आहे की या कारचा पेट्रोल इंजन चा मायलेज हा 20.51 कीमी प्रति लिटर असेल आणि सीएनजी व्हेरिएंट 26.11 कीमी प्रति किलो पर्यंतचा मायलेज देणार आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Toyota Rumion 7 Seater MPV Features and Specification
ही सेवन सीटर टोयोटा रुमिऑन कार फॅमिली सोबत प्रवास करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जात आहे. या कारच्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये आपल्याला आतील बाजूस 7- इंचाची टच स्क्रीन आहे जी अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कारप्ले ला सपोर्ट करते.
सोबतच ऑडिओ सिस्टम, टोयोटा आयकनेक्ट 55 प्लस, रिमोट क्लायमेट कंट्रोल, लॉक अनलॉक, स्मार्ट वॉच कंपॅटीबिलिटी, vehicle हेल्थ मॉनिटरिंग यांसारखे महत्त्वाचे वैशिष्ट्य या कारमध्ये आहेत.
तसाच कारच्या सेफ्टीसाठी काही गोष्टी दिल्या आहेत. ज्यामध्ये काही बिघाड झाल्यास अलर्ट सर्विस कनेक्ट देण्यात आला आहे. याशिवाय टो अलर्ट, फाइंड माय कार, पॅडल शिफ्टर्ससह 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि क्रूज कंट्रोल सारखे फीचर्स दिलेले आहेत.
अशा प्रकारे टोयोटा रुमिऑन 7 सिटर MPV कारमध्ये असलेले मोठे केबिन आणि इंटिरियर मध्ये दिले जाणारे ऍडव्हान्स फीचर्स ग्राहकांना ड्रायव्हिंग करण्यासाठी चांगला अनुभव देतील.
Toyota Rumion 7 Seater MPV Engine and Transmission
टोयोटा रुमिऑन 7 सिटर MPV कार मध्ये 1462cc चा 1.5 लिटर नॅचरली एसपीरेटेड फोर सिलेंडर पेट्रोल इंजन दिलेला आहे. हे इंजिन 6000 rpm वर 101.64bhp ची पावर आणि 4400rpm वर 136.8Nm चाट पीक टॉर्क जनरेट करते.
या इंजन सोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स ट्रान्समिशन पर्याय मिळतात. यासोबतच रुमिऑनच्या या 7 सिटर MPV मध्ये CNG पर्याय सुद्धा उपलब्ध असेल. या कारमध्ये 45L आणि 60L चा फ्युएल टॅंक दिलेला आहे.
Toyota Rumion FAQ:
Q : Toyota Rumion 7 सीटर कारमध्ये किती आणि कुठले कलर ऑप्शन दिलेले आहेत?
Ans : या कारमध्ये पाच कलर ऑप्शन आहेत: एनटाइसिंग सिल्वर, कैफ़े व्हाइट, rustic ब्राउन, spunky ब्लू and conic ग्रे.
Q : Toyota Rumion 7 सीटर चा मायलेज किती आहे?
Ans : या कारमध्ये पेट्रोल सीएनजी पर्याय आहेत.सीएनजी चा मायलेज 26.11 किलोमीटरचा आहे.
Q : Toyota Rumion 7 सीटर कारचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे?
Ans : या कारमध्ये 1462.00cc चा इंजन आहे. हा इंजन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्यायांसोबत येतो. या कारमध्ये एकूण सहा व्हेरीएंट बघायला मिळतात.