
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या वतीने भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट एसयुव्ही श्रेणीमध्ये आपला हिस्सा वाढवण्याच्या उद्देशाने 7.73 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होणारी ‘टायझर’ ही कॉम्पॅक्ट अर्बन क्रुझर मोटार लॉन्च करण्यात आली आहे. एप्रिल 2024 मध्ये दाखल झालेली ही एसयुव्ही 1.2 लिटर पेट्रोल इंजन आणि एक लिटर टर्बो पेट्रोल इंजन मध्ये उपलब्ध आहे. सोबतच एक सीएनजी व्हेरियंट सुद्धा आहे.
टाटा पंचची सर्वात मोठी प्रतिद्वंदी म्हणून टोयोटा मोटरने आपली ‘अर्बन क्रुझर टायझर’ भारतात दाखल केली आहे. स्टायलिश एसयुव्ही कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी Toyota Taisor टायझर एक चांगला पर्याय बनू शकते. ऐकून 12 व्हेरिएंट्स मध्ये ही कार उपलब्ध आहे. टोयोटा टायझर मध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, स्मार्ट कनेक्टेड फीचर्स आणि सुविधा जनक ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्स अनुभवायला मिळणार आहे. अर्बन क्रुझर टायझर च्या ऑन रोड किंमत, फीचर्स, कलर्स आणि मायलेज बद्दल आणखी जाणून घेऊयात.
Toyata Taisor On road Price in Pune
टोयोटा अर्बन क्रूजर टायझर ची पुण्यात ऑन रोड किंमत 9.10 लाख रुपये आहे आणि या गाडीच्या टॉप मॉडेल ची ऑन रोड किंमत 15.41 लाख रुपयांपर्यंत जाते. ही गाडी आपल्याला 12 व्हेरीएंट्स मध्ये बघायला मिळणार आहे, ज्यांच्या ऑन रोड किमती खाली टेबल मध्ये दिलेल्या आहेत. या ऑन रोड किमतीमध्ये एक्स शोरूम प्राईज,आरटीओ आणि विमाशुल्क समाविष्ट आहे.
Toyata Taisor EMI Down Payment
जर आपण लोन करून ही गाडी घेऊ इच्छित असाल, तर आपल्याला 2,13,726 रुपये डाऊन पेमेंट करून, 10% व्याज दराने 14,791 रुपये प्रति महिना चा 5 वर्षासाठी ईएमआय ऑप्शन उपलब्ध असणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळील शोरूमला भेटून माहिती घेऊ शकता.
Toyata Taisor Variant Wise Price -सर्व वेरियंट्स च्या किमती
अर्बन क्रुझर टायझर व्हेरियंट्स | ऑन रोड किमती |
इ पेट्रोल | 9.10 लाख रुपये |
ई सीएनजी | 9.90 लाख रुपये |
एस पेट्रोल | 10.12 लाख रुपये |
एस प्लस पेट्रोल | 10.58 लाख रुपये |
एस एएमटी पेट्रोल | 10.73 लाख रुपये |
एस प्लस एएमटी पेट्रोल | 11.19 लाख रुपये |
जी टर्बो पेट्रोल | 12.51 लाख रुपये |
वि टर्बो ड्युअल टोन पेट्रोल | 13.59 लाख रुपये |
व्ही टर्बो पेट्रोल | 13.78 लाख रुपये |
जी टर्बो एटी पेट्रोल | 14.15 लाख रुपये |
वि टर्बो एटी ड्वेल टोन पेट्रोल टॉप मॉडेल | 15.22 लाख रुपये |
वि टर्बो एटी पेट्रोल | 15.41 लाख रुपये |
टोयोटा टायझर इंजन स्पेसिफिकेशन्स

टोयोटा अर्बन क्रुझर टायझर मध्ये 1.2 लिटर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजन आहे. जो 90 बीएचपी चा पावर आणि 113 एनएम चा टॉर्क जनरेट करतो. दुसरा एक लिटर टर्बो पेट्रोल इंजन आहे. जो 100 बीएचपी चा पावर आणि 148 एनएम चा पिक टॉर्क जनरेट करतो. नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन सोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय दिला आहे आणि टर्बो पेट्रोल इंजन सोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्सचा ऑप्शन उपलब्ध आहे. अर्बन क्रुझर टायझर मध्ये नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजन सोबत सीएनजी पावरट्रेन चा ऑप्शन मिळतो. सीएनजी मोडमध्ये 77.5 बीएचपी पावर आणि 98.5 एनएम चा टॉर्क मिळतो. यामध्ये फक्त मॅन्युअल गिअर बॉक्स दिलेला आहे.
टोयोटा टायजर चे प्रमुख स्पेसिफिकेशन्स
इंजन | 998cc – 1197cc |
पावर | 76.43 – 98.69 बीएचपी |
टॉर्क | 147.6 Nm – 113 Nm |
सीटिंग कॅपॅसिटी | 5 |
ड्राईव्ह टाईप | फ्रंट व्हील ड्राईव्ह |
मायलेज | 20 ते 22.8 किमी प्रति लिटर |
टोयोटा टायझर सेफ्टी फीचर्स आणि इतर प्रमुख वैशिष्ट्ये

ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टाइजरला फीचर लोडेड एसयूवी म्हणून दाखल केलं आहे. या कारमध्ये वायरलेस चार्जर, पैडल शिफ्टर्स, क्रूज कंट्रोल, कीलेस एंट्री, पुश स्टार्ट/स्टॉप सिस्टम, इलेक्ट्रिकली अडजस्टेबल फोल्डेबल ओआरवीएम, स्टीयरिंग व्हील माउंटेड कंट्रोल्स, ऑल डोर पावर विंडोज, एंटी पिंच टेक्नॉलजी, फास्ट चार्जिंग यूएसबी पोर्ट्स, हेडअप डिस्प्ले, 360 डिग्री व्यू कैमरा, 9 इंच एचडी स्मार्टप्ले कास्ट इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 स्पीकर लैस ARKAMYS सराउंड साउंड सिस्टम, वायरलेस एंड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले, OTA अपडेट्स, टीएफटी कलर मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, टोयोटा iCONNECT सिस्टम. आणि सेफ्टी साठी 6 एयरबैग्स, वीइकल स्टैबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, रिवर्स पार्किंग सेंसर, ईबीडी सोबत एबीएस, सीट बेल्ट रिमाइंडर, एंटी थेफ्ट सिक्यॉरिटी सिस्टम सोबत आणखी स्टैंडर्ड आणि सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत.
टोयोटा अर्बन क्रूजर टायजर मायलेज आणि कलर्स
टोयोटा अर्बन क्रूजर च्या मायलेज बद्दल सांगायचं झालं तर ही कार 20 ते 22 कीमी/लिटर चा मायलेज देते. या गाडीची सिटिंग कॅपॅसिटी पाच व्यक्तीची आहे. या गाडीमध्ये आपल्याला 5 कलर ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत. लुसेंट ऑरेंज, स्पोर्टिन रेड, कैफे व्हाइट, एंटिसिंग सिल्वर, गैमिंग ग्रे, आणि तीन ड्यूल-टोनः रेड, सिल्वर आणि व्हाइट (मिडनाइट ब्लैक रूफ सोबत) मध्ये उपलब्ध आहेत. मार्केटमध्ये या गाडीचे टक्कर मारुती फ्रंक्स, महिंद्रा एक्सयुव्ही 300, टाटा नेक्सन, रेनो काइगर, किया सोनेट, होंडाई वेन्यू आणि निसान मेगनाईट सोबत होणार आहे.
टोयोटा अर्बन क्रूजर टायजर FAQ:
Q : टोयोटा अर्बन क्रूजर टायजर लांबी आणि उंची किती आहे?
Ans : टोयोटा अर्बन क्रुझर टायझर ची लांबी 3995 mm, रुंदी 1765 mm आणि उंची 1550 mm आहे. या कारचा व्हील बेस 2520 mm आहे.
Q : टोयोटा अर्बन क्रूजर टायजर मध्ये एबीएस आणि क्रूज कंट्रोल आहे का?
Ans : हो, टोयोटा अर्बन क्रूजर टायजरच्या सर्वच व्हेरियंट्स मध्ये एबीएस आणि क्रूज कंट्रोल उपलब्ध आहे.
Q : टोयोटा अर्बन क्रूजर टायजरच्या टॉप मॉडेलची ऑन रोड किंमत किती आहे?
Ans : टोयोटा अर्बन क्रूजर टायजर टॉप मॉडेलची ऑन रोड किंमत 15.41 लाख रुपये आहे. यात आरटीओ रजिस्ट्रेशन, विमा शुल्क आणि इतर चार्जेस समाविष्ट आहेत.