TVS Raider 125 Specifications in Marathi: रेडर 125 आकर्षक कलर्स आणि डिझाईन मध्ये, जाणून घ्या किंमत अन फीचर्स

TVS raider 125
TVS Raider 125

TVS Raider 125 in Marathi: टीव्हीएस रेडर 125 चे आकर्षक कलर आणि डिझाईन ने लोकांना भुरळ घातली आहे. टीव्हीएस रेडर 125 ही स्पोर्टी लूक मधील एक स्टायलिश बाईक आहे. TVS Raider 125 या गाडीमध्ये 11 कलर ऑप्शन आणि चार व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहेत. 

टीव्हीएस रेडर 125 ची सुरुवातीची किंमत ₹1,15,972 रुपये आहे, तर या गाडीच्या टॉप व्हेरियंट ची किंमत ही ₹1,26,841 लाख रुपये. या सर्व पुणे ऑन रोड किमती आहेत.

TVS Raider 125 प्राईज

व्हेरियंट प्राईज ऑन रोड पुणे
रेडर 125 सिंगल सीट – डिस्क ₹1,15,972
रेडर 125 डिस्क ₹1,17,901
रेडर 125 सुपर स्क्वाड एडिशन ₹1,20,638
रेडर 125 स्मार्टएक्सनेक्ट  ₹1,26,841

TVS Raider 125 Colors & Design – टीव्हीएस रेडर 125 चे कलर्स आणि डिझाईन

tvs-raider-125 BLACK COLOR
TVS Raider 125 Color

टीव्हीएस रेडर 125 चे डिझाईन चा विचार केला तर, यामध्ये आपल्याला समोर एलईडी हेडलाईट चे आधुनिक डिझाईन मिळालेले आहे. टीव्हीएस ची ही एक प्रीमियम स्टायलिश स्पोर्ट लुक मोटरसायकल आहे.

रेडर 125, 11 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे: Blazing Blue, फ़ीरी येलो, Striking Red, Wicked Black, Fiery Yellow (SXC), Wicked Black (SXC), Striking Red (Single Seat), Black Panther, Iron Man, Wicked Black (Single Seat), Forza Blue.

रेडर 125 मुख्य हायलाईट स्पेसिफिकेशन्स 

इंजिन कॅपॅसिटी 124.8 cc
मायलेज – एआरएआय 56.7 किमी प्रति लिटर
ट्रान्समिशन 5 स्पीड मॅन्युअल
कर्ब वेट 123 किलोग्राम
फ्युएल टॅंक कॅपॅसिटी 10 लिटर
सीट हाईट 780 mm

TVS Raider 125 Features – टीव्हीएस रेडर 125 चे फीचर्स

या गाडीच्या फीचर्स मध्ये आपल्याला 5 इंच चा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे. यामध्ये एलईडी डीआरएल सोबत एलईडी हेडलाईट, एलईडी टेल लाईट, स्टार्ट स्टॉप इंजन सुविधा आहेत.

TVS raider 125 feature
TVS Raider 125 Feature

फीचर्स मध्ये आणखी यूएसबी चार्जर, वायरलेस असिस्ट ब्लूटूथ सिस्टम,व्हॉइस असिस्टंट सिस्टम, टीव्हीएस स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि इकॉनॉमिक कॉल मेसेज नेव्हिगेशन सारखी कितीतरी फीचर्स या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खाली टेबल मध्ये टीव्हीएस रेडर 125 चे  फीचर्स दिले आहेत.

फीचर्स डिटेल्स
इन्स्ट्रुमेंट कन्सोल डिजिटल
ओडोमीटर, स्पीडोमीटर डिजिटल
हजार्ड वार्निंग इंडिकेटर, अवरेज स्पीड इंडिकेटर आहे
स्टॅंड अलार्म आहे
बॅटरी MF battery,12V 4 Ah
लो फ्युएल आणि गिअर इंडिकेटर आहे 
यूएसबी चार्जिंग पोर्ट आहे
ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन आहे

TVS Raider 125 Engine – टीव्हीएस रेडर 125 इंजन

टीव्हीएस रेडर 125 एक शानदार मायलेज(57 किमी/ लिटर) देणारी बाईक आहे, जी 4 वेरियंट आणि 11 रंगांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीएस रेडर 125 मध्ये इंजनला पावर देण्यासाठी आपल्याला 124.8 cc BS6 एअर कोल्ड सिंगल सिलेंडर इंजन आहे. जे 7500 आरपीएम वर 11.2 बीएचपी चा पावर आणि 6000 आरपीएम वर तेवढाच 11.2 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

सोबतच पाच स्पीड गिअर बॉक्स जोडलेला आहे. या गाडीच्या इंधन टाकीची क्षमता 10 लिटर आहे. रेडर 125 ची टॉप स्पीड 99 किलोमीटर प्रति घंटा आहे. ही गाडी फक्त 5.9 सेकंड मध्ये 0 ते 60 किलोमीटर ची स्पीड पकडण्यास सक्षम आहे.

TVS Raider 125 Suspension and Brakes – टीव्हीएस रेडर 125 सस्पेन्शन आणि ब्रेक

टीव्हीएस रेडर 125 मध्ये समोर टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला एक प्रीलोड ऍडजस्टटेबल द्वारे नियंत्रित केल जाते. टीव्हीएस रेडर 125 मध्ये ब्रेकिंग फ्रंटसाठी 240mm डिस्क ब्रेक आणि मागच्या रिअर व्हीलला 130mm ड्रम ब्रेक दिलेला आहे. टीव्हीएस रेडर 125 दोन्ही व्हीलच्या कंबाइनड ब्रेकिंग सिस्टीम सोबत येते.

TVS Raider 125 Rivals – रेडर 125 चा सामना

टीव्हीएस रेडर 125 चा सामना भारतीय बाजारामध्ये होंडा एसपी 125, हिरो ग्लॅमर एक्सटेक, बजाज पल्सर एनएस 125, होंडा डीआयओ 125 आणि बजाज पल्सर 125 सोबत आहे.

हेही वाचा :

टीव्हीएस रेडर 125 बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

Q : रेडर 125 मध्ये किती कलर आहेत?

Ans : टीव्हीएस रेडर 125 मध्ये 11 कलर आहेत.

Q : टीव्हीएस रेडर 125 मायलेज किती आहे?

Ans: 57 किलोमीटर प्रति लिटर चा मायलेज आहे.

Q: टीव्हीएस रेडर 125 मध्ये मुख्य स्पेसिफिकेशन काय आहे?

Ans : टीव्हीएस रेडर 125 चे वजन 123 किलोग्राम आहे. यामध्ये 124.8 cc bs6 इंजन आहे आणि याची फ्युएल टॅंक कॅपॅसिटी दहा लिटर आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment