बजाज ने आता पल्सर NS400Z ची नवीन टू व्हीलर लॉन्च केली आहे. या बाईक मध्ये चार कलर ऑप्शन दिले आहेत.

NS400Z पल्सर मध्ये फुल कलर एलसिडी डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स बघायला मिळणार आहेत.

या गाडीमध्ये डोमिनार 400 सारखा एक 373cc सिंगल सिलेंडर लिक्विड कोल्ड इंजन मिळेल.

बजाज पल्सर NS400Z 1.85 लाख सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीमध्ये उपलब्ध असेल. ही गाडी बजाजच्या डॉमीनार 400 पेक्षा 46,000 रुपयांनी स्वस्त आहे.

या गाडीची डिझाईन NS200 प्रमाणेच आहे. यामध्ये आपल्याला आकर्षक मोठे हेडलाइट्स डीआरएल आणि एलईडी प्रोजेक्ट लाईट दिले आहेत.

या गाडीमध्ये एलईडी लाईट, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि चार राईड मोड सारखे फीचर्स दिले आहेत.

या दुचाकीमध्ये डिजिटल एलसीडी युनिट मिळेल. त्याला ॲपच्या माध्यमातून स्मार्टफोन कनेक्ट करता येईल. सोबतच डिस्प्ले मध्ये कॉल, मिस कॉल आणि मेसेज नोटिफिकेशन ची माहिती दिसून येईल.

NS400Z पल्सर मध्ये 373 cc चा इंजन आहे. जो 8,800 rpm वर 39.4 bhp चा पावर आणि 6,500 rpm वर 35 Nm चा टॉर्क जनरेट करतो.

या बाईकमध्ये ब्रेकिंग साठी समोर 4 पिस्टन कॅलिपर असलेला 320mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 230mm डिस्क ब्रेक दिला आहे.

या गाडीचा टॉप स्पीड 154 किमी प्रति तास आहे. ट्रान्समिशन साठी यात 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यासोबत स्लीप आणि असिस्ट क्लच लोडेड आहे.

एंपियर नेक्सस Electric Scooter देणार 136 किलोमीटरची रेंज.