पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणीय चिंतेमुळे भारतात EV चा कल झपाट्याने वाढतोय.

 EV खरेदीसाठी कर सवलती आणि सबसिडीज उपलब्ध आहेत, ज्यामुळे विक्रीला गती मिळाली आहे.

2025 पर्यंत 4,30,000 युनिट्स EV विक्री होण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये Tata Motors चा 67% मार्केट शेअर आहे.

MG Comet EV, Tata Tiago EV, Tata Punch EV, Citroen eC3, आणि Tata Tigor EV या स्वस्त किंमतीत उपलब्ध आहेत. 

 MG Comet EV: 6.9 लाखांमध्ये उपलब्ध असून 230 किमीची रेंज देते, कॉम्पॅक्ट डिझाइन आणि शहरात सोयीस्कर.

Tata Tiago EV: 7.9 लाखांपासून सुरू; दोन बॅटरी व्हेरिएंट्ससह 257 किमी ते 315 किमी रेंज. 

Tata Punch EV: 10.9 लाखांपासून सुरू; 421 किमीची उच्च रेंज, तीन ड्रायव्हिंग मोड्स, आणि जलद चार्जिंग सुविधा. 

Citroen eC3: 11.7 लाखांमध्ये 320 किमी रेंज; आधुनिक फीचर्ससह आरामदायक इंटिरियर्स.

Tata Tigor EV: 12.5 लाखांमध्ये एकमेव इलेक्ट्रिक सेडान; 315 किमी रेंज आणि 4-स्टार NCAP सेफ्टी रेटिंग.

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा विस्तार स्वस्त आणि कार्यक्षम मॉडेल्समुळे अधिक वेगाने होतोय, ज्यामुळे स्वच्छ आणि हरित भविष्याच्या दिशेने पाऊल टाकलं जातं आहे.