हिरोची स्प्लेंडर बाईक विक्रीत देशात नंबर वन आहे, देशात सर्वात जास्त या गाडीची डिमांड आहे.

हिरो मोटोकॉर्प ने मार्च 2024 मध्ये सर्वाधिक 4.57 लाख पेक्षा जास्त युनिट्स ची विक्री केली आहे.

हिरो ने आपला सेल्स रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये, कंपनीने गाड्यांच्या निर्यातीमध्ये 31 हजार युनिट्स चा आकडा पार केला आहे.

हिरो मोटकॉर्प मध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या मॉडेल्स मध्ये स्प्लेंडर ने आपली नंबर वन पोझिशन कायम ठेवली आहे.

नंबर 1 असलेल्या स्प्लेंडरचे आकडे गेल्या वर्षीपेक्षा थोडे कमी होते. तरीसुद्धा 2,86,138 युनिट्स ची सर्वाधिक विक्री स्प्लेंडर ला आहे.

यानंतर दुसऱ्या नंबर वर HF डीलक्स आहे, या गाडीने 83,947 युनिट सेल्सचा विक्रम केला आहे.

मार्च 2024 च्या विक्रीमध्ये पॅशनला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. वर्षानुवर्षी पॅशनच्या विक्रीमध्ये 439.87% वाढ दिसत आहे.

22,491 युनिटच्या विक्रीनंतर ग्राहकांकडून पॅशनच्या डिमांड मध्ये वाढ दिसून येत आहे.

ग्लॅमर आणि डेस्टिनी 125 या गाड्यांनी क्रमशः 17,026 आणि 14,143 युनिट्स च्या विक्रीतून महत्त्वपूर्ण वृद्धी केली आहे.

हिरो मोटकॉर्प मध्ये आता नव्याने जोडल्या गेलेल्या एक्स्ट्रीम 125R आणि एक्स्ट्रीम160/200 या गाड्यांनी सुद्धा क्रमशः 12,010 आणि 2,937 युनिट्स विक्रीनंतर आपल्याकडे लक्ष आकर्षित केला आहे.

तथापि, कंपनीच्या एक्सप्लस200 आणि मेस्ट्रो या गाड्यांच्या विक्रीमध्ये क्रमशः 78.21% आणि 92.5% नी कमी दिसून आली आहे.

काय असणार खास न्यू लॉन्च Discovery Sport गाडीमध्ये, जाणून घ्या महत्वाचे फीचर्स