एप्पल कंपनीने आपले नवीन iPad Air आणि iPad Pro लेटेस्ट मॉडेल लॉन्च केले आहेत.

पहिल्यांदा कंपनीने दोन स्क्रीन साइज मध्ये आयपॅड लॉन्च केले. दोन्ही मॉडेल्स 11-इंच आणि 13-इंच स्क्रीन साइज मध्ये येतात. यामध्ये M4 चिपसेट इंट्रोड्यूस केलेला आहे.

iPad Air ब्लू, पर्पल, स्टारलाईट आणि स्पेस ग्रे कलर ऑप्शन उपलब्ध आहे. या डिवाइस ची सुरुवातीची किंमत ही 59,900 रुपये आहे.

iPad Air ला आपण 1TB पर्यंतच्या स्टोरेज ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता.

याव्यतिरिक्त iPad Air मध्ये सिंगल 12 MP रियर कॅमेरा, USB टाईप-सी चार्जिंग आणि 12 MP फ्रंट कॅमेरा मिळतो.

यासोबतच कंपनीने नवीन iPad Pro मॉडेल सुद्धा लाँच केले आहे. यामध्ये लेटेस्ट M4 चिपसेट दिलेला आहे.

iPad Pro 11-इंच आणि 13-इंच डिस्प्ले साईज मध्ये येतो. यात OLED पॅनल दिलेला आहे.

2024 iPad Pro 11-इंच स्क्रीन व्हेरियंटच्या किंमती स्टोरेज नुसार 99,900 ते 1,19,900 रुपये आहे आणि 13-इंच स्क्रीन मॉडेल ची किंमत 1,29,900 ते 1,49,900 रुपयांपर्यंत आहे.

M4 चिपसेट मुळे iPad Pro इतर डिवाइसच्या तुलनेत जास्त स्पीड देणार, असा कंपनीचा दावा आहे.

iPad Pro मध्ये फ्रंटला 12 MP चा अल्ट्रावाईड अँगल लेन्स दिला आहे आणि रियर मध्ये 12 MP चा प्राइमरी कॅमेरा आणि 10 MP अल्ट्रावाईड अँगल लेन्स दिला आहे.