KTM ने भारतात नवीन 390 Adventure आणि 390 Adventure X बाईक्स लाँच केल्या, ज्यांच्या किंमती अनुक्रमे ₹3,67,699 आणि ₹2,91,140 आहेत.
390 Adventure नवीन Gen-3 प्लॅटफॉर्मवर आधारित असून, सुधारित इंजिन आणि ऑफ-रोड बायस्ड हार्डवेअरसोबत सादर करण्यात आली आहे.
बाईकमध्ये नवीन LC4C 399cc इंजिन आहे, जे 46 HP आणि 39 Nm टॉर्क जनरेट करते आणि 6-स्पीड गिअरबॉक्ससह येते.
390 Adventure साठी WP APEX 43mm USD फोर्क्स (200mm ट्रॅव्हल) आणि 205mm ट्रॅव्हलसह प्रीमियम रियर शॉक अब्जॉर्बर देण्यात आले आहेत.
KTM 390 Adventure मध्ये स्ट्रीट, रेन आणि ऑफ-रोड असे तीन रायडिंग मोड्स उपलब्ध आहेत, तसेच कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल (MTC) देण्यात आले आहे.
बाईकला नवीन 5-इंच TFT डिस्प्ले, एलईडी हेडलाइट्स आणि सुधारित स्विचगियरसह आधुनिक लूक मिळाला आहे.
390 Adventure मध्ये 21-इंच (फ्रंट) आणि 17-इंच (रिअर) वायर-स्पोक व्हील्स आहेत, जे अधिक चांगले ऑफ-रोडिंग परफॉर्मन्स देतात.
390 Adventure X ही रोड-बायस्ड अॅडव्हेंचर बाईक आहे, जी 19-इंच (फ्रंट) आणि 17-इंच (रिअर) कास्ट व्हील्ससह येते.
390 Adventure X मध्ये नॉन-अॅडजस्टेबल WP APEX 43mm फोर्क्स आणि WP APEX इमल्शन शॉक अब्जॉर्बर दिले आहेत.
Learn more
या बाईक्स भारतीय मार्केटमध्ये Royal Enfield Himalayan 450 ला थेट टक्कर देणार आहेत!