बऱ्याचदा कार चालवत असताना मायलेजचा सुद्धा विचार केला जातो.

तुम्हाला सुद्धा हा प्रश्न नक्कीच पडला असेल, की कार कुठल्या गिअर मध्ये चांगला मायलेज देते.

तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे चांगल्या मायलेज साठी गिअर खूप महत्त्वाचा आहे. 

पहिल्या गिअर मध्ये कारच्या इंजिन वर सर्वाधिक लोड असतो.

अशातच इंजिनवर जास्त लोड पडल्यामुळे सर्वात जास्त इंधन खर्च होते.

त्यामुळे लवकरच कार 20 kmph च्या स्पीड वर आल्यावर पहिल्या गिअर मधून दुसऱ्या गिअर मध्ये शिफ्ट करायला पाहिजे.

नंतर 35-40 kmph ची स्पीड पकडल्यावर कार लवकर तिसऱ्या गिअर मध्ये टाकली पाहिजे.

कार 40-50 kmph च्या स्पीडला आल्यावर चौथा गिअर टाकावा.

कारचा 50 kmph पेक्षा जास्त स्पीड झाल्यावर पाचवा गिअर टाकावा.  

आपण जर अशा पद्धतीने गिअर शिफ्ट करत असाल, तर नक्कीच आपली कार चांगला मायलेज देणार.

कारचे इंजन ऑइल केव्हा बदलले पाहिजे, जाणून घ्या महत्त्वाची माहिती