लोक कार खरेदी करायच्या आधी त्यांच्या फीचर्स बद्दल माहिती घेतात, आम्ही आपल्यासाठी भारतातील 200 kmph पेक्षा जास्त स्पीड देणाऱ्या कारची माहिती देत आहोत.

या टॉप स्पीड कारच्या लिस्टमध्ये हुंडाई, फॉक्स्वागेन, जीप आणि स्कोडा सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

या लिस्टमध्ये पहिली कार आहे फॉक्स्वागेन वर्ट्स, या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11,55,900 रुपये आहे आणि टॉप स्पीड ही 200 kmph आहे.

दुसरी महिंद्रा XUV700 कार टॉप स्पीड कारच्या लिस्ट मध्ये समाविष्ट आहे, या कारची एक्स-शोरूम किंमत ही 13.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

जीप कंपास या कारची टॉप स्पीड 210 kmph आहे. या कारची एक्स-शोरूम प्राईस 20.69 लाख रुपयांपासून सुरू होते.

जीप कंपास या कारला एलइडी हेडलॅम्प सोबत डिझाईन केले आहे, या कार मध्ये 21.3 सेंटीमीटरचा टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे.

स्कोडा स्लेविया या कारच्या पेट्रोल इंजन चे चार व्हेरियंट मार्केटमध्ये आहेत, ही कार सुद्धा 200 kmph चा टॉप स्पीड देते.

स्कोडा स्लेवीया कारची एक्स-शोरूम प्राईस 11,53,400 रुपये आहे.

हुंडाई वेन्यू या कारची टॉप स्पीड 210 kmph आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 11 लाख ते 17.42 लाख रुपये पर्यंत जाते.