Hero Mavrick 440 Price in Marathi: Hero Motocorp ने भारतीय मार्केटमध्ये आपली सर्वात पावरफुल गाडी Maverick 440 लॉन्च केली आहे. Hero Maverick 440 मध्ये एकूण 3 व्हेरियंट आहेत. याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये आहे. आणि मावरीक 440 च्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2,24,000 रुपये आहे. ही बाईक 5 रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे.

440 सीसी BS6 इंजन द्वारा या गाडीला संचलित केले गेले आहे. हे इंजन 27 bhp चा पावर आणि 36 Nm चा टॉर्क जनरेट करते. सोबतच Maverick 440 च्या ब्रेकिंग मध्ये आपल्याला डिस्क ब्रेक अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम द्वारे कंट्रोल केल्या जाते. Mavrick 440 मध्ये आपल्याला 30 Kmpl सर्वाधिक मायलेज मिळतो. या बाईकच्या प्राईज आणि फीचर्स बद्दल जाणून घेऊयात.
Hero Maverick 440 On Road Price in Pune
Maverick 440 मध्ये आपल्याला 3 व्हेरिएंट पाहायला मिळतात, सोबतच यामध्ये पाच कलर ऑप्शन अवेलेबल असणार आहेत. पुण्यात या गाडीची मावरिक 440 बेस व्हेरियंट ची ऑन रोड किंमत 2,44,439 रुपये आहे, तर मावरीक 440 टॉप व्हेरियंट ऑन रोड किंमत 2,72,965 रुपये आहे. पुण्यातील या ऑन रोड किमतीमध्ये आपल्याला एक्स शोरूम किंमत, आरटीओ आणि विमा पॉलिसी समाविष्ट करून मिळणार आहे.

व्हेरियंट | ऑन रोड प्राईस पुणे |
Maverick 440 बेस | ₹ 2,44,439 |
Maverick 440 एमआयडी | ₹ 2,61,555 |
Maverick 440 टॉप | ₹ 2,72,965 |
या गाडीचे बुकिंग सुरू झालेली आहे. तुम्ही जर ही बाईक घेण्यासाठी इच्छुक असाल, तर हिरो मोटर जवळील शोरूम किंवा www.heromotocorp.com जाऊन बुक करू शकता. या गाडीची डिलिव्हरी एप्रिलमध्ये सुरू होईल. कंपनीने ग्राहकांसाठी “Welcome to Maverick Club Offer” सुरू केली आहे. ज्यामध्ये 15 मार्चपर्यंत बुक करणाऱ्या ग्राहकांना कंपनीतर्फे Maverick असेसरीज किट आणि दहा हजार रुपये पर्यंत अनेक वस्तू मिळतील.
Hero Maverick 440 Features
Maverick 440 ही एक स्ट्रीट बाईक आहे. या बाईकचे वजन 191 किलोग्राम आहे. Maverick 440 च्या फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये आपल्याला एलईडी इलुमिनेशन आणि डिजिटल कन्सोल दिलेला आहे. यामध्ये आणखी नेविगेशन सोबत एसएमएस अलर्ट साठी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी दिली आहे. यासोबतच यामध्ये टाईप सी चार्जिंग पोर्ट सुद्धा जोडलेला आहे.
Mavrick 440 Specifications

हिरो मावरीक 440 इंजिन कॅपॅसिटी | 440 cc |
ट्रान्समिशन | 6 स्पीड मॅन्युअल |
कर्ब वजन | 191 किलोग्रॅम |
फ्युएल टॅंक कॅपॅसिटी | 13.5 लीटर्स |
मॅक्स स्पीड | 110-150 kmph |
मायलेज |
30 kmpl |
सीट हाईट | 803 mm |
ग्राउंड क्लिअरन्स | 175 mm |
Overall length | 2100 mm |
Hero Maverick 440 Engine
Maverick मध्ये 440 cc, सिंगल सिलेंडर इयर ऑइल कोल्ड इंजन दिलेला आहे. जो 27 bhp चा पावर आणि 36 Nm चा टॉर्क जनरेट करतो. ट्रान्समिशन मध्ये याला 6 स्पीड गिअर बॉक्स दिलेला आहे. यामध्ये 13.5 लिटरचा फ्युएल टॅंक असणार आहे. Maverick 440 मध्ये टेलिस्कोपिक फॉर्क आणि मोनोशॉक सस्पेन्शन दिलेले आहेत. सोबतच यामध्ये समोर 320 mm आणि मागे 240 mm डिस्क ब्रेक च्या सोबत dual चैनल abs दिलेला आहे.
एवढ्या पावरच्या बाईकसाठी टायर सुद्धा तेवढ्याच ताकदीचे लागणार आहेत. त्यासाठी Maverick 440 मध्ये समोर 110/70 आणि मागे 150/60 चे टायर्स असणार आहेत. यामध्ये बेस मॉडेल साठी आणि टॉप स्पेक साठी अलोय व्हील्स ऑफर केले आहेत.
Hero Maverick 440 FAQ:
Q : 2024 हिरो मावरीक 440 ची ऑन रोड किंमत किती आहे?
Ans : 2024 पुण्यात हिरो मावरीक 440 ऑन रोड किंमत 2,44,439 रुपये आहे. यामध्ये एक्स शोरूम किंमत, आरटीओ आणि विमा शुल्क समाविष्ट आहे.
Q : हिरो मावरीक 440 कलर ऑप्शन कुठले आहेत?
Ans : Maverick 440 मध्ये पाच कलर ऑप्शन आहेत, जे Arctic White, Fearless Red, Celestial Blue, Phantom Black आणि Enigma Black
Q : हिरो मावरीक 440 बाईक मध्ये मुख्य स्पेसिफिकेशन काय आहे?
Ans : मावरीक 440 एक स्ट्रीट बाईक आहे. या गाडीचे वजन 191 किलोग्रॅम आहे. यामध्ये आपल्याला 440cc फेज 2 इंजन आणि 13.5 लिटर फ्युएल टॅंक कॅपॅसिटी आहे.