Hero Xoom 160 maxi scooter ची हिरो वर्ल्ड 2023 पासूनच चर्चा सुरु आहे. पण Hero कंपनीने आता भारत मोबिलिटी एकस्पो 2024 मध्ये Hero Xoom 160 चे प्रोडक्शन मॉडेल लॉन्च केलं आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने 156 सीसी लिक्विड कुल्ड सिंगल-सिलेंडर इंजन दिलेले आहे. जे 14bhp पावर आणि 13.7 Nm टॉर्क जनरेट करतो.
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात, लोकांना मोठ्या प्रमाणात हिरो कंपनीच्या बाईक्स आणि स्कूटर आवडतात.हिरो कंपनी लवकरच Hero Xoom 160 स्कूटर भारतात लॉन्च करणार आहे. थोडासा स्कूटर आणि थोडासा मोटरसायकल कॉम्बिनेशन मधे लाँच करण्यात आलेल्या, हिरो झूम 160 स्कूटरच्या स्पेसिफिकेशन आणि किमती बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Hero Xoom 160 Price In India (Expected) (Hero Xoom 160 ची किंमत )
हिरो ची ही आगामी ऑफ-रोड स्कूटर असणार आहे. अतिशय शानदार कॉलिटी आणि कलर कॉम्बिनेशन मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Hero Xoom 160 च्या भारतातील किमतीबद्दल हिरो कंपनीने अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार, हिरो झूम 160 ची भारतातील एक्स-शोरूम किंमत ही ₹1,10,000 ते ₹1,45,000 च्या दरम्यान असू शकते.
Hero Xoom 160 Specification (Hero Xoom 160 ची वैशिष्ट्ये)
Hero Xoom 160 बद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्कूटर, लुक मध्ये स्पोर्ट मोटरसायकल प्रमाणे दिसते. उत्कृष्ट फिनिशिंग आणि ग्राफिक्स द्वारे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला ही गाडी बघायला मिळते.
Scooter Name | Hero Xoom 160 |
Hero Xoom 160 Launch Date In India | March 2024 (Expected) |
Hero Xoom 160 Price In India | 1.10 Lakh Rupees To 1.45 Lakh Rupees (Estimated) |
Engine | 156cc liquid cooled single cylinder engine |
Power | 14 bhp (estimated) |
Torque | 13.7 Nm Torque (estimated) |
Brakes | Disc Brake (Front and Rear both sides) |
Transmission | Automatic |
Mileage | More Than 40 kmpl |
Features | Digital Instrument Cluster, LED Headlamp, Bluetooth Connectivity, Smart Key, USB Charging Port |
Wheels Size | 14″ |
Speedometer | Digital |
Rival | या गाडीची तुलना मार्केटमध्ये एरॉक्स 155, बजाज पल्सर 150, होंडा यूनिकॉर्न सोबत आहे. |
Hero Xoom 160 Design (Hero Xoom 160 चे डिझाईन)
Xoom 160 मॅक्सी स्कूटर च्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, या स्कूटर मध्ये आपल्याला अतिशय स्टायलिश आणि आकर्षक डिझाईन पाहायला मिळते. हीरोने ही स्कूटर ऑफ रोडींग साठी डिझाईन केली असून ही स्कूटर अतिशय आकर्षक आणि भविष्यवादी आहे. या स्कूटर च्या समोर एक स्टायलिश स्प्लिट एलईडी हेडलाईट आणि एक मोठा विंडो स्क्रीन पाहायला मिळतो.स्कूटर मध्ये आपल्याला 170 mm चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो.
Hero Xoom 160 Engine (Hero Xoom 160 चे इंजिन)
Hero Xoom 160 मॅक्सी स्कूटर मध्ये आपल्याला अतिशय शक्तिशाली इंजन देखील पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला 156 सीसी लिक्विड-कुल्ड्, सिंगल-सिलेंडर इंजन पाहायला मिळते, जे 8,000 rpm वर 14 बीएचपी पॉवर आणि 6,500 rpm वर 13.7 Nm टॉर्क जनरेट करते.
Hero Xoom 160 Features (Hero Xoom 160 चे फीचर्स)
अतिशय उत्कृष्ट कलर कॉम्बिनेशन आणि स्पोर्टी मोटरसायकल लूक असलेली Hero Xoom 160 मध्ये शानदार फीचर्स मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं या गाडीचा एक्झॉस्ट जो की एका स्पोर्टी मोटरसायकल प्रमाणेच आहे.
सोबतच आपल्याला या स्कूटरवर डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, LED लाईट्स, स्मार्ट की, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रिमोट की इग्निशन, यूएसबी चार्जिंग पोर्ट, हिरोचे ड्युअल डिस्क ब्रेक यांसारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.
Hero Xoom 160 Launch Date In India (expected)
Hero Xoom 160 मॅक्सी स्कूटर ही गाडी भारत मोबिलिटी एक्सपो 2024 मध्ये लॉन्च झाल्यावर मार्केटमध्ये कधीपर्यंत येणार आहे, याबद्दल ग्राहकांमध्ये आतुरता लागली आहे. भारतातील Hero Xoom 160 चा लॉन्च तारखे बद्दल बोललो तर, हिरोने या स्कूटरची लॉन्च तारखे बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पण काही मीडिया न्यूज रिपोर्ट नुसार, ही स्कूटर भारतात मार्च 2024 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते.
Hero Xoom 160 Brakes, Wheels and Suspension
Hero Xoom 160 scooter मध्ये समोर टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क्स सस्पेन्शन आहे आणि मागच्या बाजूला ड्युअल रियल शॉक ॲपसॉर्बर सस्पेन्शन आहे. हिरो झूम 160 च्या ब्रेक बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये फ्रंट आणि रीयर व्हील ला डिस्क ब्रेक आहेत. सिंगल चैनल abs सुद्धा आहे. ही स्कूटर 14 इंच अलोय सह येते.
Hero Xoom 160 Mileage (हिर झूम 160 मायलेज)
Hero Xoom 160 ही एक मॅक्सी स्कूटर आहे, ज्यामध्ये आपल्याला 156 सीसी BS6 फेज 2 इंजन मिळतो. जो आपल्याला 14bhp पावर उपलब्ध करून देतो. या गाडीच्या मायलेजचा विचार केला तर, ही गाडी 40 (kmpl) किलोमीटर प्रति लिटर किंवा त्यापेक्षा जास्त मायलेज प्रदान करते. Hero Xoom 160 गाडीची टॉप स्पीड ही 90 kmph आहे.
Also Read:
- Maruti Fronx Turbo Velocity Edition Price,Design in Marathi: मारुती फ्रोंक्सचा टर्बो वेलोसिटी एडिशन झाला लॉन्च! मिळणार या 16 नवीन ॲक्सेसरीज आणि फीचर्स जाणून घ्या.
- Tata Curvv Price, Specification, Design: टाटा कर्वचा शानदार लुक लॉन्च, पावरफुल इंजिन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या
- Hero Surge S32 Price, Specification and launch date in Marathi: फक्त 3 मिनिटात रिक्षाची होईल बाईक, जाणून घ्या फीचर्स
Hero Xoom 160 Maxi Scooter FAQ:
Q : Hero Xoom 160 लॉन्च डेट?
Ans : March 2024 expected
Q: Hero Xoom 160 चा मायलेज?
Ans : 40 किलोमीटर प्रति लिटर पेक्षा जास्त.
Q: Hero Xoom 160 ची मार्केटमध्ये कॉम्पिटिशन
Ans : Yamaha Aerox 155 आणि Aprilia SXR160.